Small Business Idea Marathi : अलीकडे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना दिली जात आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. हेच कारण आहे की, अलीकडे वेगवेगळे स्टार्टअप सुरू झाले आहेत.
नोकरी ऐवजी आता नवयुवकांचा उद्योगधंद्यांकडे कल वाढला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नोकरीमध्ये आता शाश्वती राहिलेली नाही. केव्हा नोकरीवरून काढले जाईल याचा काही नेम नाही. यामुळे आता नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. शासन देखील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहे.
पंतप्रधान मुद्रा योजनेसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना अर्थसहाय्य पुरवले जात आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशात नवीन स्टार्टअपची संख्या वाढली आहे. जर तुम्हीही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
कारण की आज आपण अशा एका बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत जो बिजनेस फक्त दहा हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोणता आहे तो व्यवसाय
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे स्टेशनरीचा व्यवसाय. हा असा व्यवसाय आहे ज्याची बाजारात बारा महिने मागणी असते. हा व्यवसाय कधीच मंदीत येत नाही. बारा महिने स्टेशनरी सामानांची बाजारात मागणी पाहायला मिळते. शाळा जेव्हा सुरू होतात तेव्हा आणि परीक्षा जेव्हा असते तेव्हा या बिजनेसची मागणी अधिक वाढते.
हा व्यवसाय शाळा किंवा महाविद्यालय शेजारी सुरु केला पाहिजे. जर तुमचे घर शाळा, कॉलेजजवळ असेल तर तुम्ही तुमच्या घरातच हा व्यवसाय सुरू करू शकता. किंवा मग तुम्ही शाळा किंवा कॉलेजचे जवळ जागा शोधून या व्यवसायाची सुरुवात करू शकणार आहात.
पेन, पेन्सिल, नोट पॅड, वही, पुस्तक, कॅल्क्युलेटर, स्टेपलर, रिबीन, गिफ्ट अशा विविध वस्तू तुम्ही तुमच्या स्टेशनरी दुकानात ठेवू शकणार आहात. याशिवाय तुम्ही विद्यार्थ्यांच्या इतरही गरजेच्या वस्तू तुमच्या दुकानात ठेवू शकता. यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते अशा गोष्टींची तुम्ही तुमच्या दुकानात विक्री करू शकणार आहात.
किती भांडवल लागेल
या व्यवसायासाठी खूपच कमी भांडवल लागते. पण तुम्ही तुमचे दुकान अशा ठिकाणी ओपन केले पाहिजे जिथे शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी सहजतेने पोहोचू शकतील. जर तुम्ही तुमचे दुकान शाळा किंवा कॉलेज जवळ ओपन केले तर तुमच्या व्यवसायाला चांगला बूस्ट मिळणार आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 50 हजार ते 60,000 पर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. यापेक्षा कमी गुंतवणुकीत देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. पण एक चांगले स्टेशनरी शॉप जर तुम्हाला उघडायचे असेल तर किमान 50 ते 60 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. एवढी गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता यानंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही गुंतवणूक वाढवू शकणार आहात.
किती कमाई होऊ शकते
व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉलो कराव्या लागतील. जसे की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ऑफर ठेवू शकता. वही, पुस्तक यांसारख्या वस्तूंच्या खरेदीवर तुम्ही विद्यार्थ्यांना काही आकर्षक गिफ्ट देऊ शकता. तुम्ही जर योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉलो केली तर या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते.
सरासरी दिवसाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न तुम्हाला या व्यवसायातून सहजतेने मिळू शकते. परंतु या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे सर्वस्वी तुमच्या सेलिंगवर अवलंबून राहणार आहे. तथापि या व्यवसायातून दिवसाला एक हजार रुपयांपर्यंतची कमाई सहजतेने होऊ शकते.