Small Business Idea Marathi : 21व्या शतकाला कंप्यूटरचे युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जेंव्हापासून बाजारात लॅपटॉप, कंप्युटर, अँड्रॉइड फोन आले आहेत तेव्हापासून तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मोठी नेत्रदीपक अशी प्रगती पाहायला मिळत आहे. यामुळे विविध रोजगाराच्या देखील संध्या उपलब्ध झाल्या आहेत. खरतर गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगात बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
आता, नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहेत. विशेषता भारतातील तरुणांचा माईंडसेट गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे चेंज झाला आहे. आता व्यवसायालाच प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी एका भन्नाट बिजनेस प्लॅन बाबत माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण ज्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत तो व्यवसाय फक्त एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरु करता येऊ शकतो आणि या व्यवसायातून दिवसाला तीन हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.
कोणता आहे तो व्यवसाय
खरंतर अलीकडे लॅपटॉप, कम्प्युटर मोबाईल यांसारख्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंप्यूटर, लॅपटॉप हे उपकरण आता नोकरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बनले आहे. यामुळे जवळपास प्रत्येक कुटुंबात कम्प्युटर आणि लॅपटॉप पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणून कम्प्युटर आणि लॅपटॉपचे मार्केट खूपच वाढले आहे. लॅपटॉप आणि कम्प्युटरचा बाजार खूप मोठा झाला आहे.
यासोबतच लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेरिंग करणाऱ्यांची देखील मागणी वाढली आहे. यामुळे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेरिंग चे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षणानंतर तुम्ही हा व्यवसाय सहजतेने सुरू करू शकणार आहात.
कुठे घेणार प्रशिक्षण ?
तुम्ही तुमच्या परिसरात असणाऱ्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर रिपेरिंग प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊ शकता. किंवा तुम्ही CNet.com आणि ZDN.com सारख्या ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या वेबसाइटवर देखील याबाबतचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहात. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही YouTube किंवा कोणत्याही संगणक प्रशिक्षण केंद्रावर जाऊन याचे सविस्तर प्रशिक्षण घेऊ शकणार आहात.
कुठे सुरू करणार व्यवसाय ?
तुम्ही हा व्यवसाय तुम्ही राहत असलेल्या शहरात सुरू करू शकता. मात्र हा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू करा जेथे नागरिकांना सहजतेने पोहोचता येईल. बाजारपेठ असलेल्या भागात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक दुकान भाड्याने घ्यावे लागेल.
तुम्ही तुमच्या घरातूनही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या व्यवसायाची योग्य पद्धतीने मार्केटिंग करावी लागणार आहे. पण जर तुम्ही हा व्यवसाय शहरात असलेल्या व्यापारी संकुलात सुरू केला तर तुमचा व्यवसाय लवकर हिट होऊ शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. परंतु जर तुम्ही तुमचा व्यवसाय चांगला गाळा घेऊन चांगल्या व्हीआयपी ठिकाणी सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला पाच लाखांपर्यंतचे गुंतवणूक करावी लागू शकते.
किती कमाई होणार ?
संगणक दुरुस्ती केंद्र उघडण्यासाठी, तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांची गुंतवणूक सुरू करावी लागेल. या रकमेतून तुम्हाला तुमच्या दुकानासाठी आवश्यक उपकरणे आणि फर्निचर इत्यादी सेटअप पूर्ण करावा लागणार आहे.
एकदा काम सुरू झाले की, तुम्ही तुमचा व्यवसाय नंतर वाढवू शकता. जर तुमचे काम चांगले चालले तर तुम्ही एका दिवसात 3000 रुपये सहज कमवू शकता. अर्थातच या व्यवसायातून तुम्हाला महिन्यासाठी 90 हजारापर्यंत ची कमाई होऊ शकते.