Small Business Idea Marathi : येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी सुरू होणार असल्याने देशात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीचा सण म्हणजे दिवा, पणती, रंगीबेरंगी लाइटिंग, नवीन कपडे, नवीन अलंकार, चिवडा, चकली, करंजी हे सर्व आलंच.
दरम्यान जर तुम्ही या दिवाळीच्या सणाला अतिरिक्त पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक भन्नाट बिजनेस प्लॅन घेऊन हजर झालो आहोत. खरंतर अलीकडे तरुणाईचा माईंडसेट पूर्णपणे बदलला आहे.
आता नवयुवक तरुणांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे. तर काही तरुण छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न बाळगून आहेत. म्हणजेच आता तरुणाईला नोकरी ऐवजी व्यवसायात अधिक रस वाटू लागला आहे.
मात्र तरुण वर्गाकडून कोणता व्यवसाय करावा याबाबत नेहमीच विचारणा होत असते. यामुळे आज आम्ही तरुणांसाठी दिवाळीच्या सणात चालणारा एका हंगामी बिझनेस आयडिया बाबत माहिती घेऊन आलो आहोत.
कोणता आहे बिजनेस
आज आपण दिव्यांच्या व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत. दिवाळीला मातीचे दिवे आणि पणत्या यांना बाजारात मोठी मागणी असते. दिवाळी म्हणजेच दीपोत्सव. या सणाला खूप मोठ्या प्रमाणात दिवे आणि पणत्या लावल्या जातात.
दिवाळीत सजावटीसाठी दिवे लावले जातात. अलीकडे इलेक्ट्रॉनिक दिवे देखील बाजारात आले आहेत. पण अनेक लोक इलेक्ट्रॉनिक ऐवजी आजही मातीचे दिवे आणि पणत्या लावतात.
त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुमच्यासाठी हा व्यवसाय दिवाळीत फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात तुम्हाला खूपच कमी भांडवल लागते. तुम्ही मात्र पाच ते दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात.
किती कमाई होणार
या व्यवसायासाठी तुम्हाला दहा हजारापर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. तुम्ही 90 पैशांपासून ते एक रुपयांपर्यंत होलसेल मध्ये पणती तसेच दिव्यांची खरेदी करू शकता आणि हे दिवे बाजारात पाच रुपयांपर्यंत विकू शकता.म्हणजेच या व्यवसायातून तुम्हाला चांगला मार्जिन मिळणार आहे.
जर तुम्ही बाजारपेठांमध्ये स्टॉल लावून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगली कमाई होऊ शकणार आहे. यंदाच्या दिवाळीत या व्यवसायातून तुम्ही 50 हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकणार आहात.
मात्र हे सर्वस्वी तुमच्या सेलिंगवर अवलंबून राहणार आहे. जर तुम्ही दिव्यांची आणि पणत्यांची चांगली मार्केटिंग केली आणि चांगल्या लोकेशनला तुमचा स्टॉल लावला तर तुम्हाला या व्यवसायातून निश्चितच चांगली कमाई होऊ शकणार आहे.