Small Business Idea : सध्या संपूर्ण भारत वर्षात सणासुदीचा काळ सुरू आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. आता दिवाळीचा सण येणार असल्याने बाजारात मोठी रेलचेल वाढली आहे.
दरम्यान, आज आपण या सणासुदीच्या काळात सुरू करता येणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर अलीकडे अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या चार व्यवसायंबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या व्यवसायाची विशेषता अशी की हे व्यवसाय सणासुदीच्या काळात बंपर कमाई करून देऊ शकतात.
मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय : अलीकडे सणासुदीमध्ये सजावट करण्यासाठी मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. रंगीबेरंगी मेणबत्ती आता छोट्या फंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहे. लग्न असो किंवा छोटे-मोठे फ़ंक्शन, बर्थडे, एनिवर्सरी असो सर्वत्र सजावटीसाठी रंगीबेरंगी मेणबत्तीचा वापर केला जात आहे.
दिवाळीमध्ये देखील सजावटीसाठी रंगबिरंगी मेणबत्ती वापरली जात आहे.यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार आहात. या व्यवसायासाठी तुम्हाला 50 हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते.
हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून सुरु करू शकता किंवा भाड्याने गाळा घेऊन देखील या व्यवसायाची सुरुवात करता येते. या व्यवसायासाठी तुम्हाला मेणबत्ती मेकिंग मशीन याची गरज भासणार आहे. बाजारात या मशीनची किंमत 35 हजार रुपयांपासून सुरू होते. तुम्ही हे मशीन आणि आवश्यक असलेल्या कच्चे मटेरियल खरेदी करून या व्यवसायाची सुरुवात करू शकणार आहात.
इलेक्ट्रॉनिक दिवे : सणासुदीच्या काळात घर असो, दुकान असो किंवा कोणतीही सरकारी इमारत असो, सर्वत्र रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघतात. सजावटीसाठी इलेक्ट्रॉनिक दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत दिव्यांना बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. विशेष म्हणजे दिवाळीच्या काळात डेकोरेटिव्ह लाईट मोठ्या प्रमाणात विक्री होतात. यामुळे जर तुम्हाला ही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या डेकोरेटिव्ह लाइट्सचा व्यवसाय सुरू करू शकता.
तुमच्या बजेटनुसार तुम्ही घाऊक बाजारातून रेडीमेड दिवे विकत घेऊ शकता आणि जवळच्या बाजारात विकू शकता. यामध्ये चांगले मार्जिनही मिळते. तुम्ही तुमची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सुद्धा विकू शकणार आहात. हा व्यवसाय तुम्ही 50 हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करून सुरू करू शकता आणि यातून चांगले कमाई तुम्हाला होणार आहे.
सजावटीच्या वस्तू : सणासुदीत लोक आपली घर, कार्यालय, फार्महाऊस रंगीबेरंगी झुंबरे आणि दिव्यांनी सजवत असतात. यासोबतच अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनीही घरांची सजावट केली जाते. यामुळे सणासुदीच्या काळात सजावटीच्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते.
यंदाच्या दिवाळीत देखील सजावटीच्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी येणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचारात असाल तर तुम्ही सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही घाऊक बाजारातून सजावटीच्या वस्तू खरेदी करून किरकोळ बाजारात त्याची विक्री करू शकता आणि यातून प्रचंड नफा कमवू शकणार आहात.
मातीचे दिवे : दिवाळीला आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी आहे. दिवाळीत मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिवे लावून दिवाळीच्या काळात घर, ऑफिस, फार्महाउस प्रकाशमान केले जाते. अशा परिस्थितीत मातीच्या दिव्याचा बिझनेस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
हे दिवे तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा तुम्ही कुंभाराकडून दिवे खरेदी करून ते किरकोळ बाजारात विक्री करू शकता. वेगवेगळ्या डिझाइनचे दिवे तुम्ही खरेदी करून याची किरकोळ बाजारात विक्री करू शकणार आहात. हा व्यवसाय फक्त 10 ते 20 हजार रुपये गुंतवणूक करून सुरू करता येऊ शकतो.