भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातून धावणार ! केव्हा सुरु होणार Sleeper Vande Bharat Express ? कसा असणार रूट, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sleeper Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चेअर कार सीटिंग अरेंजमेंट आहे. पण स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये इतर स्लीपर एक्सप्रेस प्रमाणेच बर्थ असतील.

खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली. पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी धावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली. सध्या स्थितीला देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.

विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 17 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच येत्या चार दिवसात मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.या वंदे भारत ट्रेनला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

निश्चितच मुंबई येथील सीएसएमटी ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष फायदेमंद राहणार आहे.

या ट्रेनमुळे या संबंधित शहरातील नागरिकांचा प्रवास जलद अन सुरक्षित होईल अशी आशा आहे. अशातच आता महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान ही पहिली Sleeper वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.

सध्या स्थितीला दिल्ली ते मुंबई या मार्गांवरील रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग हा 80 ते 100 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळ मजबूत करणे आणि दोन्ही बाजूला भिंती बांधण्याचे काम सुरू आहे.

मिशनशी संबंधित अभियांत्रिकी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भिंत आणि ट्रॅक मजबूत करण्याव्यतिरिक्त, ट्रॅक जितका सरळ होईल तितका वेग वाढणार आहे. या प्रकल्पातील पश्चिम रेल्वे परिसरातील 107 वक्र ट्रॅक सरळ करण्यात आले आहेत. उर्वरित 27 वक्र ट्रॅक देखील लवकरच सरळ केले जातील.

ताशी 160 किमी वेगासाठी, 60 किलो 90 यूटीएस रेलची आवश्यकता असते, तर भारतीय रेल्वेमध्ये बहुतेक ठिकाणी 52 किलो 90 यूटीएस रेल ट्रॅक स्थापित आहेत. यामुळे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ला सुरू करण्यासाठी ट्रॅक बदलावे लागणार आहेत.

यासाठी मुंबई-दिल्ली मार्गावरील ट्रॅक बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. वेग वाढवण्यासाठी रुळाखालील दगडीचा थर हा 250 mm वरून 300 mm केला जात आहे. म्हणजे जेव्हा ही कामे पूर्ण होतील त्यानंतर या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुढल्या वर्षी ही स्लीपर ट्रेन सुरु होऊ शकते असा दावा केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा