स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला रे ! देशातील ‘या’ राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, कस राहणार महाराष्ट्रातील हवामान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Skymet Weather Update : देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. देशाच्या काही राज्यांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे.

उत्तर भारताचा विचार केला असता उत्तर भारतात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रात्रीच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याचा परिणाम म्हणून आता उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात आणि दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

कमाल आणि किमान तापमान कमी होत असल्याने थंडीमध्ये वाढ होऊ लागली आहे. तथापि यावर्षी महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर पाहायला मिळालेला नाही.

परंतु आगामी काही दिवसात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा दावा केला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान बघायला मिळू शकते मात्र राज्यात पुढील पाच दिवस कुठेच पाऊस बरसणार नसल्याचे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेट, दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.

यामुळे या संबंधित भागांमध्ये शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबामुळे किनारपट्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सुद्धा हलका पाऊस झाला आहे.

विशेष बाब म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा सध्या ताशी 20 किमी वेगाने उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे. तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र आता चक्रीवादळात रूपांतरीत झाले आहे.

या चक्रीवादळास मिधिली असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ आज अर्थातच 18 नोव्हेंबरच्या रात्री किंवा उद्या सकाळी 60-70 किमी प्रतितास ते 80 किमी प्रतितास या वेगाने बांगलादेश किनारपट्टीजवळ असलेल्या खुपापाराला ओलांडण्याची शक्यता काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.

तथापि या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसून यामुळे महाराष्ट्रात पाऊस बरसणार नसल्याचे हवामान विभागाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. दरम्यान, स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. SKYMET ने सांगितल्याप्रमाणे, पुढील २४ तासांत त्रिपुरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तसेच दक्षिण आसाम, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये एक किंवा दोन जोरदार सरी पडून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालच्या उत्तर किनार्‍यावर विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.