Skymet Monsoon Update : एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रातील दिवसाचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. राज्यातील काही भागात तर याहीपेक्षा अधिकचा तापमानाची नोंद केली जात आहे.
दरम्यान राज्यात गेल्या दोन-तीन दिवसात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची देखील हजेरी पाहायला मिळाली. हा पूर्वमोसमी पाऊस मात्र शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. उन्हाळ्यात जर पाऊस झाला तर पावसाळ्यात कमी पाऊस होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे ते पुढील खरीप हंगामाकडे. तसेच यंदाचा मान्सून कसा राहणार ? हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. खरेतर गेल्या मान्सून काळात म्हणजे 2023 च्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची नोंद करण्यात आली.
अनेक ठिकाणी अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी देखील आता भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट आतापासूनच डोकेदुखी वाढवत आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मान्सून काळात एलनीनोमुळे महाराष्ट्रसहित भारतात पावसाळी काळात कमी पाऊस झाला.
परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदाचा पावसाळा कसा राहणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशातच स्कायमेट या भारतातील खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मान्सून 2024 संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणतंय स्कायमेंट
स्कायमेंटने दिलेल्या माहितीनुसार सध्या एलनिनो सक्रिय आहे. पण एप्रिल किंवा मे दरम्यान एल निनो न्यूट्रल म्हणजे तटस्थ होणार आहे. असे झाल्यास ही बाब मान्सून 2024 साठी सकारात्मक राहणार आहे. ही परिस्थिती मान्सून काळात चांगला पाऊस दर्शवत आहे.
विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात ला निना ना सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ला निनाची तीव्रता ही ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अधिक पाहायला मिळणार आहे. हेच कारण आहे की यावर्षी चांगल्या मान्सूनची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात चांगले पाऊसमान राहील असे स्कायमेट या संस्थेने म्हटले आहे. सदर संस्थेने सांगितल्याप्रमाणे जर ला नीना साठी पोषक परिस्थिती तयार झाली तर यंदा खूपच चांगला पाऊस होणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते असे या संस्थेने म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे या संस्थेने इंडियन ओशियन डायपोल सुद्धा यंदा पॉजिटीव्ह राहणार अशी शक्यता वर्तवली आहे. जेव्हा इंडियन ओशियन डायपोल सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह राहतो त्यावर्षी नेहमीच चांगला पाऊस होत असतो. दरम्यान यंदा देखील अशीच परिस्थिती राहणार आहे.
यामुळे मान्सूनला याचा फायदा होऊ शकेल अन यंदा मान्सून काळात सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने दिलेला आहे. यामुळे आता स्कायमेटचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे. तथापि भारतीय हवामान विभागाचा जेव्हा मान्सूनचा पहिला अंदाज येत्या काही दिवसात समोर येईल तेव्हाच याबाबत आणखी स्पष्टता येऊ शकणार आहे.