Shetkari Karjmafi News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. पुन्हा एकदा जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेचा हप्ता वाढवणे अशी मोठमोठे आश्वासने दिली.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जी आश्वासन दिलीत त्या आश्वासनांवर महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आता महायुती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणार का याकडे साऱ्या महाराष्ट्रातील लक्ष राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी मोठी घोषणा केली होती. म्हणून महायुतीने सत्ता स्थापित केल्यापासून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.
दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाले असले तरी अजून नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. पण, आज-उद्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे वृत्त समोर आले आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
सोमवारपासून अर्थातच 16 डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. नागपुरात हे अधिवेशन संपन्न होणार असून या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
दरम्यान आता याच संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती. त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल, अशी शेतकऱयांची अटकळ होती.
पण, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. म्हणून कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनातं होणार नाही, असे चित्र आहे. नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत सहकार विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता कर्जमाफी देण्यासाठी तयारीबाबत कोणतेही निर्देश अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.