SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. बँकेकडून स्वस्तात गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
याशिवाय बँक एफडी करणाऱ्यांना अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज देत आहे. परिणामी या बँकेत एफडी केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
दरम्यान आज आपण होम लोन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुम्हालाही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.
कारण की आज आपण एसबीआय बँकेकडून 60 लाख रुपयाचे होम लोन 30 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर कितीचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो, एसबीआय बँक होम लोन साठी किती व्याजदर आकारते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय बँक किती व्याजदर आकारते
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया गृह कर्जासाठी ग्राहकांकडून त्यांच्या क्रेडिट स्कोरच्या आधारावर 9.15 टक्क्यांपासून 9.65 टक्क्यांपर्यंतचे व्याज आकारते.
समजा जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला 9.15% या किमान व्याज दरात गृह कर्ज मिळू शकणार आहे. क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो.
750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर हा चांगला मानला जातो. म्हणजे जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला एसबीआय कडून कमी व्याज दरात कर्ज मिळणार आहे.
एसबीआय प्रोसेसिंग फी घेते का?
होम लोन साठी एसबीआय कडून प्रोसेसिंग फी आकारली जाते. एसबीआय कडून किमान दोन हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे प्रक्रिया शुल्क किंवा प्रोसेसिंग फी घेतली जाते. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. GST धरून ही रक्कम वाढू शकते.
60 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता
एसबीआय कडून जर 60 लाख रुपयांचे होम लोन घेतले आणि तीस वर्षाचा परतफेड कालावधी ठेवला तर 9.15% व्याजदर दराने ग्राहकांना 48 हजार 926 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या तीस वर्षांच्या काळात तुम्ही 1.16 कोटी रुपयांचे व्याज भरणार आहात. अशा तऱ्हेने तुम्हाला ते 60 लाखाचे घर 1.76 कोटी रुपयांना पडणार आहे.