ब्रेकिंग : सातबारा उताऱ्यावर आता ऑनलाइन वारस नोंद करता येणार, अर्ज कसा करणार ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satbara Utara Varas Nond Online : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करता येणार आहे.

खरंतर, याआधी वारस नोंद ही ऑफलाइन पद्धतीने केली जात होती. ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद लागत असे. अनेकदा मात्र तलाठी कार्यालयात तलाठी हजर नसणे, तलाठी रजेवर असणे, गर्दी जास्त असणे, यांसारख्या एक ना अनेक कारणांमुळे फक्त वारस नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे वारस नोंद करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत, त्यांचा वेळ वाया जात. अनेक ठिकाणी तर वारस नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अवाजवी पैशांची वसुली देखील होत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आणि वारस नोंद करताना शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी शासनाने ही प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

सरकारने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या वारसाची नोंद करता येणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांनी वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर याची तलाठीच्या माध्यमातून पडताळणी होईल आणि पडताळणी पूर्ण झाली की मग लगेचच सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद लागून जाईल.

ऑनलाईन वारस नोंद करण्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार

वारस नोंद 1 ऑगस्ट 2023 पासून आता ऑनलाईन करता येऊ लागली आहे. त्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज सादर करावा लागत आहे. जर आपणासही सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद करायची असेल तर यासाठी तुम्हाला https/pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

सर्वप्रथम संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर संकेतस्थळावरील पब्लिक डेटा एन्ट्री पेज ओपन करावे लागणार आहे. हे पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रोसीड टू लॉगिन हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचे खाते उघडावे लागेल.

म्हणजेच तुम्हाला इथे स्वतःला रजिस्टर करायचे आहे. हे रजिस्ट्रेशन चे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच स्वतःचे खाते उघडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला या संकेतस्थळावरून वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.