ब्रेकिंग ! समृद्धी महामार्ग तब्बल 5 दिवसांसाठी राहणार बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भर घालू पाहणारा, राज्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

खरंतर राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी या महामार्गाची उभारणी केली जात आहे. या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किलोमीटर एवढे आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत या मार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक देखील जोरात सुरू आहे. या मार्गाचे नागपूर ते भरवीर पर्यंतचे जवळपास 600 किमीचे काम पूर्ण झाले असून यावर सध्या वाहतूक सुरू आहे.

विशेष म्हणजे उर्वरित शंभर किलोमीटरच्या महामार्गाचे काम देखील या वर्षी अखेरपर्यंत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. एकंदरीत संपूर्ण समृद्धी महामार्ग हा पुढल्या वर्षापासून सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो. अशातच मात्र हा महामार्ग पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केव्हा राहणार बंद ?

मिळालेल्या माहितीनुसार, जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम केले जाणार असल्याने १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान आणि २५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत महामार्गाचा हा भाग वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे.

अर्थातच संपूर्ण समृद्धी महामार्ग बंद राहणार नाही. उर्वरित भागातील महामार्ग तसाच सुरू राहील मात्र या कामामुळे सदर भागातील महामार्ग काही काळासाठी बंद केला जाणार आहे.

परंतु ज्या भागात काम सुरु आहे त्या भागातील संपूर्ण वाहतूक या कालावधीमध्ये बंद राहणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला देण्यात आली आहे.

पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार

महामार्ग बंद असताना प्रवाशांना पर्याय मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहनचालक जालना इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने जाऊ शकतात.

तसेच, शिर्डीकडून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना देखील सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध – दिशेने निधोना जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे जाता येणार आहे.