समृद्धी महामार्गालगत ‘या’ सोयीसुविधा विकसित होणार ! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. या महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे.

आतापर्यंत या मार्गाचे जवळपास 600 km पर्यंतचे काम पूर्ण झाले असून हा भाग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उपराजधानी नागपूर ते भरवीर दरम्यानचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरू आहे.

यामुळे नागपूर ते भरवीर हा प्रवास चांगलाच गतिमान झाला आहे. समृद्धी महामार्ग हा एकूण सातशे किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शंभर किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

येत्या नवीन वर्षात हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान झालाय पण या महामार्गावर होणारे अपघात सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे.

दरम्यान महामार्गावर होणारे अपघात नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.शातच आता या महामार्गालगत आवश्यक सर्व प्रकारच्या सोयीसुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे, समृद्धी महामार्गालगत १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ही सर्व कामे येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या समृद्धी महामार्गाचा बहुतांशी भाग वाहतुकीसाठी सुरू आहे.

पण महामार्गलगत अजूनही अत्यावश्यक सोयीसुविधा तयार झालेल्या नाहीत. पण आता पेट्रोल पंप, उपहारगृह, स्वच्छतागृह यांसारख्या सोई सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सोबतच समृद्धी महामार्गावर होणारे अपघात नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

त्यामुळे हे अपघात नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी ‘मेटल क्रॅश बॅरियर्स, बसवले जात आहेत. आतापर्यंत याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक किलोमीटरनंतर गती कमी होण्यासाठी ‘रंबलिंग स्ट्रिक’ प्रकारचे गतीरोधक सुद्धा विकसित केले जात आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा