मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे शहरासाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sambhajinagar Vande Bharat Train : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे.

तेव्हापासून आजतागायत देशातील 34 मार्गावर ही गाडी सुरू आहे. या गाडीची विशेषता म्हणजे ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. मात्र रेल्वे बोर्डाने ही गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवण्यास परवानगी दिली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु अद्याप ही गाडी आपल्या पूर्ण क्षमतेने धावत नाहीये. काही ठिकाणी ही गाडी सरासरी 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे तर काही ठिकाणी याहीपेक्षा कमी वेग मिळत आहे. पण रुळाचे अपग्रेडेशन पूर्ण झाले की या गाडीचा वेग वाढणार आहे. ही गाडी महाराष्ट्रातील एकूण सहा महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसचा सहावा मार्ग नुकताच सुरू झाला आहे. या चालू महिन्यात राज्याला सहावी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. खरंतर भारतीय रेल्वेने इंदोर ते भोपाळ यादरम्यान एक वंदे भारत ट्रेन सुरू केली होती. पण मध्यप्रदेश राज्यात सुरू झालेली ही ट्रेन रेल्वे प्रवाशांमध्ये फारशी लोकप्रिय बनली नाही. या गाडीला खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. यामुळे रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आणि ही गाडी आता इंदोर ते नागपूर दरम्यान चालवली जात आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सहा एवढी झाली आहे. राज्यातील मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.

अशातच आता महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांना आता वंदे भारत ट्रेनची सौगात मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माध्यमातून राजधानी मुंबई ते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर दरम्यान आणि पुणे ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.

विशेष असे की याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वे कडून तयार झाला आहे. तसेच हा प्रस्ताव मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे देखील सादर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. असं सांगितले जात आहे की, केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्च 2024 पर्यंत 75 महत्त्वाचा मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेच्या कोणत्या मार्गावर ही गाडी सुरू केली पाहिजे याबाबत मध्य रेल्वे विभागाला विचारणा करण्यात आली होती. यावर मध्य रेल्वे विभागाकडून राजधानी मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद दरम्यान ही गाडी चालवली पाहिजे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. रेल्वे बोर्डाने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु लवकरच रेल्वे बोर्ड याबाबत सकारात्मक निर्णय घेईल आणि या दोन महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होईल असे मत व्यक्त होत आहे.

यामुळे, आता रेल्वे बोर्ड या प्रस्तावावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. पण मुंबई ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ही गाडी सुरू झाली तर मराठवाड्यातील नागरिकांसाठी राजधानी मुंबई आणखी जवळ येणार आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास आणखी जलद होईल यामुळे मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.