Safflower oil production : रशिया – युक्रेन युद्धाचा(Russia-Ukraine War) परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर(International market) झालेला आपणाला दिसत आहे. तर या युद्धाच्या मुळाशी तिथे असणार्या खनिज तेलावर हुकमत मिळवणे हे असून. परिणामी त्या देशांच्या निर्यातीवर अवलंबून असणार्या देशात आयात न झाल्याने तेथील तेलाचे भाव वाढणार हे तितकेच सत्य आहे.
भारत(India) हा लोकसंख्येने जगात दुसरी मोठी हक्काची बाजार पेठ असणार देश आहे. म्हणून आम्ही नुसता आयातीचा धडाका लावलेला आहे. तर आपल्या कडे तेलाचे साठे नाहीत.त्या मुळे आम्हीं केवळ आयतीवरच अवलंबून आहे.तर आखाती देशात अमेरीकेने जे काही केलं याच्या मुळाशी पेट्रोल हेच होते.
आपल्या देशाचा जी.डी.पी दर हा केवळ कृषिक्षेत्र मुळेच टिकून आहे. तर त्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी सरकार तयार नसल्याचे आपल्याला दिसत आहे. अर्थात या क्षेत्रात शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. तर शेतीला पूरक असे तेल पिके घेण्यास सरकारने शेतकऱ्यांना प्रवृत्त केले पाहिजे.
आपला देश दरवर्षी अत्यंत विषारी असणाऱ्या पाम तेलाचे आयात करून कृषी क्षेत्रातील तेल उद्योगांवर अवलंबून असणारे लघु उद्योग त्यामुळे पार रसातळाला गेले आहेत. याला पर्याय म्हणून तेल उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे.
तर करडीचे पिक याला उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मोहरी यांचे उत्पादन घेऊन. गावो गावी बंद पडलेले तेल घाणे परत जिवंत झाले पाहिजेत.तस पाहिलं तर तेल ही आज ही आपली फार मोठी ताकत आहे.
करडीच्या तेला मध्ये दोन प्रकार आहेत.त्यात पहिल्या प्रकाराचा वापर हा लिन्सिड ऑईल ऐवजी पेंटिंगमध्ये करण्यात येतो.पांढऱ्या पेंटमध्ये याचा वापर जास्त करतात कारण याला लिन्सिड ऑईल वापरल्यामुळे येणारी पिवळी झाक येत नाही.
तर दुसर्या प्रकारातील तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स(Oleic acid) हे जास्त प्रमाणात असते.तर पहिल्या प्रकारात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी सिड(Linoleic acid) असते.सध्या बाजारात दुसर्या प्रकाराचे खाद्यतेल असते. यातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ऑलिव्ह ऑईल पेक्षा कमी असते.
आपल्या देशात विषारी पाम तेल 95 हजार कोटींच्या आसपास आयात केली जाते. दरवर्षी आयातीवर येणारा खर्च हा जर शेतकऱ्यांच्या तेल उत्पादक पिके घेण्याच्या मार्गदर्शनावर केला. तर शेतकऱ्यांमध्ये देशाच्या समृद्धीचे गणित सामावेल.