Royal Enfield Bullet Showroom Business : गेल्या काही वर्षांपासून भारतासहित संपूर्ण जगभरात नोकर कपातीचे वारे वाहू लागले आहे. कंपन्या जागतिक मंदीमुळे आता मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत.
यामुळे खाजगी क्षेत्रात मोठे उलथापालथ पाहायला मिळत आहे. लोकांना आता खाजगी क्षेत्रातील नोकरी बाबत शाश्वती राहिलेली नाही. कंपन्या केव्हा कामावरून काढून टाकतील याचा काही नेम नाही. यामुळे आता खाजगी क्षेत्रात नोकरी करण्यास तरुणांची नापसंती पाहायला मिळत आहे.
खाजगी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करावा असे आता तरुणांना वाटत आहे. ही मानसिकता कोरोना काळापासून अधिक दृढ होत चालली आहे. वेळेवर प्रमोशन न मिळणे, वाढती महागाई, थांबलेली पगार वाढ या सर्व पार्श्वभूमीवर आता नोकरीतून मिळणारा पैसा संसाराचा गाडा हाकण्यासाठी अपुरा पडू लागला आहे.
म्हणून आता आर्थिक प्रगती साधण्यासाठी नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल, तुमचा स्वतःचा नवीन स्टार्टअप सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आम्ही तुमच्यासाठी एका नवीन बिजनेस प्लॅन बाबत माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही रॉयल इन्फिल्ड बुलेटचे शोरूम कसे सुरु केले जाऊ शकते याबाबत माहिती घेऊन आलो आहोत. वास्तविक भारतात अनेक दुचाकी निर्मात्या कंपन्या आहेत.
मात्र देशात रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या बुलेटला ग्राहकांनी विशेष पसंती दाखवली आहे. या गाडीचे लाखो लोक शौकीन आहेत. रॉयल एनफिल्ड बुलेटची विक्री भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात होत असते. रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी आहे.
यामुळे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही रॉयल इन्फिल्ड बुलेट चे शोरूम सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला रॉयल इन्फिल्ड कंपनीसोबत भागीदारी करावी लागणार आहे आणि शोरूम सुरू करण्यासाठी तुम्हाला कंपनीची डीलरशिप घ्यावी लागणार आहे.
कशी घेणार रॉयल एनफिल्ड कंपनीची डीलरशिप
रॉयल एनफिल्ड कंपनी तुम्हाला शोरूम सुरू करण्यासाठी डीलरशिप ऑफर करते. यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही गुंतवणूक मात्र करावी लागते. जर तुम्हाला रॉयल इन्फिल्ड ची डीलरशिप घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील करावा लागणार आहे.
यासाठी https://www.royalenfield.com/in/en/forms/become-a-dealer/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती फिलअप करावी लागणार आहे.
तुम्हाला येथे तुमचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, तसेच रहिवासी पत्ता यांसारखी महत्त्वाची माहिती प्रविष्ट करायची आहे. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेवटी टर्म्स अँड कंडिशन मान्य कराव्या लागतील.
यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. हा अर्ज सबमिट झाल्यानंतर रॉयल एनफिल्ड कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल आणि मग तेथून पुढे डीलरशिप बाबतची प्रोसेस सुरू होईल.
किती गुंतवणूक करावी लागेल ?
मीडिया रिपोर्टनुसार, तुम्हाला रॉयल एनफील्ड डीलरशिपसाठी किमान 50 लाख रुपये एवढी गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र गुंतवणुकीची ही रक्कम तुम्ही कोणत्या ठिकाणी रॉयल इन्फिल्ड शोरूम सुरू करू इच्छिता त्यावर अवलंबून राहणार आहे.
जर तुम्ही शहरी भागात रॉयल इन्फिल्ड चे शोरूम सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला गुंतवणूक अधिक करावी लागू शकते. तसेच जर तुम्ही ग्रामीण भागात रॉयल एनफिल्ड शोरूम सुरू करू इच्छित असाल तर गुंतवणुकीची ही रक्कम स्थानानुसार कमी होऊ शकते. म्हणजेच तुम्ही तुमचे शोरूम कुठे सुरू करणार यावरच ही रक्कम अवलंबून राहील.
किती कमाई होते ?
आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे रॉयल इन्फिल्ड चे शोरूम सुरू केले तर यातून शोरूम मालकाला किती नफा मिळू शकेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की रॉयल एनफिल्ड बाईक किंवा बुलेट विक्रीनंतर कंपनीकडून संबंधित शोरूम मालकाला कमिशन दिले जाते.
एका अहवालानुसार, डीलरला प्रत्येक बाइकच्या विक्रीवर सुमारे 15 टक्के एवढे कमिशन मिळते. म्हणजेच, जर तुम्ही 1.5 लाख रुपयांची बाइक विकली तर तुम्हाला 22,500 रुपये एवढे कमिशन मिळू शकणार आहे. जर समजा तुम्ही महिन्याला पंधरा गाड्या विकल्या तर तुम्हाला या व्यवसायातून तीन लाख 37 हजार पाचशे रुपये एवढा नफा मिळू शकणार आहे.