budget session :अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत.
मात्र या घोषणा येत्या काही दिवसात प्रत्यक्षात किती उतरणार हे पाहावे लागणार आहे. नियमित कर्ज परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रूपये प्रोत्साहनपर कर्ज देण्याची घोषणा पुन्हा एकदा झाली.कोरोनाच्या काळात आर्थिक नियोजनाअभावी याची पूर्तता करण्यात न आल्याने यंदा शेतकऱ्यांना यंदा ही रक्कम नक्की पुरविली जाणार आहे.
ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली तेव्हा कोरोना नव्हता. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्या काळात महसूल सरकारला मिळत नव्हता. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले आहे. राज्याकडे महसूलही गोळा होतो आहे. त्यामुळे आता यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत मिळणार आहे.
तर ५० हजार रूपये प्रोत्साहनपर मिळणारी रक्कम राज्यातल्या २० लाख शेतकऱ्यांना दिली जाणार असून त्याकरिता १० हजार कोटींच खर्च अपेक्षित आहे. तर भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपायांची कर्जमाफी केली जाणार आहे.
आणि विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचे काम देखील राज्य सरकार नाबार्ड, राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँककडून हाती घेण्यात येणार आहे. यासाठी देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले