Reliance Jio Petrol Pump : अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. पण कोणता व्यवसाय सुरू करायचा हे सुचत नाही. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत चर्चा करणार आहोत.
देशातील तरुणाईचा माईंडसेट कोरोना काळापासून चेंज झाला आहे आता नवयुवकांना नोकरी ऐवजी व्यवसायात रस वाटू लागला आहे. याचे कारण म्हणजे खाजगी क्षेत्रातील नोकरीमध्ये आता शाश्वती राहिलेली नाही. केव्हा नोकरीवरून काढले जाईल याबाबत काही सांगता येत नाही.
यामुळे आता तरुण वर्ग नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत आहे. तसेच नोकरीमध्ये एक मर्यादित उत्पन्न मिळते मात्र व्यवसायात असिमीत उत्पन्न मिळवले जाऊ शकते. हेच कारण आहे की व्यवसाय सुरू करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. अशा परिस्थितीत आज आपण एका व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण रिलायन्स जिओ पेट्रोल पंप कसा सुरू करता येतो याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
रिलायन्स जिओ पेट्रोल पंप सुरू करून किती कमाई होऊ शकते ?
रिलायन्स जिओ पेट्रोल पंप सुरू करून महिन्याकाठी दहा लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. हो, या व्यवसायातून तब्बल दहा लाखांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता असते. मिळालेल्या माहितीनुसार एक लिटर पेट्रोल विकले तर डीलरला जवळपास अडीच ते तीन रुपये नफा मिळतो.
डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक लिटर डिझेल विकले तर दोन ते अडीच रुपये नफा मिळतो. म्हणजे जर दिवसाकाठी चार ते पाच हजार लिटर पेट्रोल डिझेल विकले तर मासिक कमाई ही दहा लाखांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच जर यापेक्षा अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाली तर उत्पन्नाचा हा आकडा वाढणार आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे महामार्गालगत किंवा रस्त्यालगत जमीन असणे आवश्यक आहे. हायवे किंवा एक्सप्रेस वे लगत जर जमीन असेल तर तुमचा व्यवसाय चांगला चालणार आहे. पेट्रोल पंप खोलण्यासाठी 800 स्क्वेअर फुट जागा लागते. मात्र जर तुम्ही एक्सप्रेसवे लगत पेट्रोल पंप चालू करणार असाल तर पंधराशे स्क्वेअर फिट जागेची तुम्हाला गरज भासणार आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तीन मॅनेजर ठेवावे लागतील. याशिवाय हवा भरण्यासाठी दोन आणि पेट्रोल भरण्यासाठी आठ अशी दहा लोक कामाला ठेवावी लागणार आहेत. पेट्रोल पंप उभारताना तुम्हाला शौचालय देखील तयार करावे लागेल. याशिवाय तुम्हाला वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी सोय करावी लागणार आहे.
एकंदरीत रिलायन्स जिओचा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास 70 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये जमिनीची किंमत किंवा भाडे, 23 लाख रुपये परत करण्यायोग्य सावधगिरी ठेव आणि 3.5 लाख रुपये स्वाक्षरी शुल्क यांचा समावेश करण्यात आला आहे. आता आपण रिलायन्स जिओ-बीपी पेट्रोल पंप खोलण्यासाठी कसा अर्ज करावा लागणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
अर्ज कसा करणार बरं ?
जर तुमचा पेट्रोल पंप खोलण्याइतका बजेट असेल आणि रिलायन्स जिओ बीपी पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर तुम्हाला यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला jio-bp https://partners.jiobp.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इच्छुक आहात असे कंपनीला कळवावे लागणार आहे. या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होणार आहे. येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. तुमचे नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर अशी सर्व महत्वाची माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे आणि मग व्यवसायासाठी अर्ज करता येणार आहे.
यासाठी तुम्हाला वेबसाइटवरील आमच्याशी संपर्क साधा या पर्यायावर जावे लागणार आहे. मग तुम्हाला पुढील पर्याय म्हणून व्यवसाय चौकशी निवडावी लागणार आहे.
यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल. हा या व्यवसायासाठीचा महत्त्वाचा अर्ज आहे. येथे अर्जदारांना व्यवसायाशी संबंधित आणि त्यांची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. यात जमिनीबाबत देखील माहिती द्यावी लागणार आहे. विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण राहिली तर फॉर्म फेटाळला जातो.
मग कंपनीकडून तुम्ही सादर केलेल्या अर्जाचे पुनरावलोकन करेल म्हणजे पडताळणी करेल. सर्व काही यथायोग्य असेल तर प्रक्रिया पुढे जाईल. या अंतर्गत कंपनीचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधणार आहे.
पेट्रोल पंप बांधकामासाठी कच्चा माल, बांधकाम साहित्य आणि अगदी ब्रँडचे फर्निचर, स्टँड, पीओएस मशीन, उपकरणे इत्यादी दाखवावे लागतील.
बांधकाम प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रिलायन्स पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणी सुद्धा केली जाते. फ्रँचायझीला अंतिम प्रमाणपत्र देण्यापूर्वी पंप कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतली जाईल. यानंतर अर्जदार काम सुरू करू शकतो.