नवीन वर्षाआधीच सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बातमी ! 1 जानेवारीपासून रेशन वाटप होणार बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Shop Strike : नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरंतर नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. अशातच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील रेशन दुकानदार संपावर जाणार आहेत.

यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला रेशन मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2024 पासून राज्यातील सर्व रेशन दुकानदार संपावर जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांमागे नवीन वर्ष सुरू होताच शुक्लकाष्ट लागणार की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ऑल इंडिया फेअर्स प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारी 2024 पासून बेमुदत संप पुकारला आहे. याच संपात महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने देखील सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाच्या माध्यमातून मान्य होत नसल्याने रेशन दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. याचा मात्र सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 53 हजार स्वस्त धान्य दुकानदार आहेत.

हे सर्व दुकानदार आता त्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी संपावर जाणार आहेत. यामुळे 53 हजार स्वस्त धान्य दुकानदारांच्या रेशन दुकानाला कुलूप राहणार आहे. साहजिकच याचा फटका सर्वसामान्य गरीब जनतेला बसणार आहे.

खरे तर राज्यातील रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राज्य शासनासमवेत बैठक झाली होती. मात्र या बैठकीत फक्त आश्वासने देण्यात आलीत. सरकारने रेशन दुकानदारांच्या मागणीबाबत ठोस भूमिका घेतली नाही.

यामुळे राज्यातील रेशन दुकानदारांनी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर्स प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनच्या संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशन दुकानदारांनी आनंदाचा शिधा ही राज्य शासनाची महत्वाची योजना कायमस्वरूपी राबवली पाहिजे आणि यामध्ये कांदा, चणाडाळ, तूर डाळ, मुंग डाळ या वस्तूंचा समावेश केला पाहिजे अशी मागणी केली आहे.

याशिवाय रेशन दुकानदारांची मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करणे, मार्जिन मनी दोनशे रुपये करणे, 2G ऐवजी 4G मशीन देणे अशा इत्यादी मागण्या रेशन दुकानदारांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

दरम्यान रेशन दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार यावर काय तोडगा काढते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा