Ration Card News : देशभरातील गरीब नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना दिलासा मिळतो. मात्र अनेकजण शासनाच्या योजनांसाठी अपात्र असतानाही लाभ घेतात.
चुकीचे कागदपत्रे सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ घेतला जातो. रेशन कार्ड बनवताना देखील अनेक जण चुकीचे डॉक्युमेंट सादर करतात. दरम्यान जर तुम्हीही नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण रेशन कार्ड संदर्भातील नियम अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की शासनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड दिले जाते.
विशेष म्हणजे कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. मात्र हे रेशन कार्ड फक्त गोरगरीब जनतेसाठी म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी आहे. यामुळे रेशन कार्ड बनवताना शासनाने लावून दिलेल्या काही अटींचे पालन करावे लागते.
जे लोक या अटींचे पालन करत नाहीत त्यांना रेशन कार्ड मिळत नाही. दरम्यान आज आपण कोणत्या लोकांना रेशन कार्ड मिळू शकत नाही या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणाला मिळत नाही रेशन कार्ड ?
आज आपण रेशन कार्ड संदर्भातील काही महत्वाचे नियम पाहणार आहोत. या नियमानुसार ज्या व्यक्तींकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन असेल ज्यामध्ये प्लॉट, फ्लॅट आणि घर असेल तर अशा व्यक्ती रेशन कार्ड साठी अर्ज करू शकत नाहीत.
ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहन, ट्रॅक्टर असेल तर अशा लोकांना ही रेशन कार्ड मिळणार नाही. ज्या लोकांकडे फ्रीज, एसी अशा वस्तू असतात त्या लोकांनाही रेशन कार्ड मिळत नाही. ज्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा कुटुंबाला देखील रेशन कार्ड दिले जात नाही.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आणि शहरी भागात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा अधिक असते अशांना रेशन कार्ड दिले जात नाही.
जे नागरीक आयकर भरतात ते राशन कार्ड बनवू शकत नाही. तसेच परवानाधारक शस्त्र असणाऱ्या नागरिकांना देखील रेशन मिळत नाही.