बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात उद्यापासून 13 डिसेंबरपर्यंत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain) शक्यता आहे. मॅनदौस चक्रीवादळामुळे तामिळनाडूत रेड अलर्ट देण्यात आलाय. या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवणार आहे.
मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मॅन-दौस चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, त्यामुळे ११ ते १३ डिसेंबरदरम्यान बीड, उस्मानाबाद, लातूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात परिणाम जाणवणार
महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा ठळक परिणाम जाणवणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाळी स्थिती राहणार आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.
तामिळनाडूतील १३ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील 3 ते ४ दिवस काही ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
रात्री थंडी, दिवसा ऊब महाराष्ट्रात मुंबईसह कोकण वळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात साधारण ४, तर कमाल तापमानात २ अंशांनी सरासरीपेक्षा घसरण होऊन रात्री थंडी, दिवसा उबदारपणा जाणवत आहे.
कोकणात मात्र दोन्ही तापमानांत सरासरीपेक्षा २ ‘ अंशांनी ही घसरण जाणवेल. रविवारी ढगाळ वातावरण राहील. सोमवारनंतर दोन्ही तापमानांत वाढ होईल. चेन्नई मध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना डशारा- तामिळनाडूतील तिरुवल्लूर, चे, चेंगलपद् व कांचीपुरम जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तिरुपतूर, कृष्णगिरी, धर्मपुरी,कल्लाकुरीची, अर्यालूर, तिचिरापल्ली, करुर, डरोड, सेलम येथे हलका ते मध्यम पाऊस होईल.
चक्रीवाद शनिवार पहाटे तामिळनाहच्या महाबलीपुराम किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे हवेच्या अतितीब्र दाबात तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचे हवेच्या तीव्र दाबात रुपांतर हो्डल.
वाहने मोकळ्या जागेत करा पार्क –
लोकांना त्यांच्या गाड्या झाडांखाली न ठेवता मोकळ्या जागेत पार्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या असूत, सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकांना दोन दिवस समुद्रकिनार्यावर न जाण्यास सांगण्यात आले आहे. पुदुचेरी आणि करा्कलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये रुक्वारी बंद ठेवण्यात आल्या.
समुद्रकिनार्यावरील सर्व दुकाने बंद-
चक्रीवादळाच्या डशाऱयामुळे समुद्रकिनार्यालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर सुरक्षेसाठी मासेमारीच्या नौका समुद्रकिनाऱयापासून दूर ठेवण्यात आल्या होत्या, रुग्णवाहिकाही तेनात करण्यात आल्या. चक्रीवादळ सहा तासांत ३ किमी. वेगाने जवळजवळ परिचेम-वायव्य दिशेने सरकले, त्यानंतर ते तीव्र आले.