पावसाच पुन्हा कमबॅक ! येत्या 48 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागाला झोडपणार, हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert : यावर्षी मान्सूनचा लहरीपणा हा खूपच त्रासदायक ठरत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. शिवाय जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र जुलै महिन्यात अचानक राज्यात खूप मोठा पाऊस पडला.

राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस पडेल अशीच आशा शेतकऱ्यांना होती. पण ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. संपूर्ण महिना कोरडा गेला.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे खरीपातील पिके अक्षरशा जळून खाक होण्याच्या मार्गावर होती. तर काही ठिकाणी पिके जळाली. अशातच मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात नव्या आशेने झाली आहे. सप्टेंबरची सुरुवातच पावसाने झाली असल्याने ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट या चालू महिन्यातून भरून निघेल असे सांगितले जात आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात ही जोरदार पावसाने झाली. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मात्र आता कालपासून पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण वगळता राज्यातील इतर भागातून पाऊस गायब झाला आहे.

यामुळे आता पावसाचे पुन्हा एकदा केव्हा आगमन होणार असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. या अशा परिस्थितीत आता भारतीय हवामान विभागाने पावसा संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान खात्याने येत्या 48 तासात राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

आज 12 सप्टेंबर रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आणि उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच 13 आणि 14 सप्टेंबरला देखील अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

परंतु 15 सप्टेंबर पासून म्हणजे शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने पावसाचा जोर वाढू शकतो असे सांगितले जात आहे. कोकणातील दक्षिण भागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

याशिवाय मुंबई आणि उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मध्यम पाऊस पडणार असे हवामान खात्याने नमूद केले आहे. याशिवाय मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील काही भागात जोरदार सऱ्या बरसतील असे सांगितले जात आहे.