रेल्वे प्रवाशांसाठी गोड बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार दुसरी वंदे भारत एक्सप्रेस, 18 डिसेंबरला PM Modi दाखवणार हिरवा झेंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. सर्वात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावरून या गाडीचे संचालन सुरू झाले.

तेव्हापासून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने देशातील विविध मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन चालवली जात आहे.

विशेष म्हणजे, मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन चालवण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

एवढेच नाही तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वर्ष 2047 पर्यंत देशातील 4500 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाईल अशी माहिती दिली आहे.

अशातच आता नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत.

2019 पासून या मार्गावर जी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे त्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून विशेष प्रेम दाखवले जात आहे. त्यामुळे या मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.

या गाडीचे वेळापत्रक मात्र पहिल्या गाडी पेक्षा भिन्न राहणार आहे. पण अद्याप या गाडीचे वेळापत्रक ठरलेले नाही. येत्या काही दिवसात मात्र या गाडीचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे.

दरम्यान 17 आणि 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदार संघात अर्थातच वाराणसीला जाणार आहेत. यावेळी आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

याच दौऱ्यात नवी दिल्ली ते वाराणसी यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या वंदे भारत ट्रेन चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा