रब्बी हंगामात गव्हाला मिळणार हेक्टरी 45 हजार रुपयाचे पीक कर्ज, कांद्याला किती मिळणार ? वाचा पिकनिहाय कर्जाचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rabi Season : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे आता येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, जवस, सूर्यफूल, बटाटा इत्यादी पिकांची लागवड होणार आहे. दरम्यान पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांना भांडवलाची आवश्यकता लागणार आहे.

खरीप हंगामातून चांगले उत्पादन मिळाले नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिक कर्जाची गरज पडणार आहे. खरतर शेतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये यासाठी पीक कर्ज वाटप केले जाते. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना पैशांची कमतरता भासू नये यासाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यात लातूर जिल्ह्याचा विचार केला असता जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षात पिक कर्ज वाटपाचे दर यापूर्वीच निश्चित करून दिले आहेत. यानुसार आता शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान आता आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोणत्या पिकासाठी किती पिक कर्ज देण्याचे ठरवले आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पिकनिहाय पिक कर्जाचे दर ?

खरंतर , जिल्ह्यात गहू, जवस, करडई, कांदा, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, बटाटा इत्यादी पिकांची रब्बी हंगामामध्ये लागवड केली जाते. यंदा देखील रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना एक ऑक्टोबर पासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे.

पीक कर्जाचे 31 डिसेंबर पर्यंत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात 155 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान उद्दिष्टानुसार 100% पीक कर्जाचे वाटप केले पाहिजे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिल्या आहेत.

यानुसार सध्या जिल्ह्यात पिक कर्जाचे वाटप युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कोरडवाहू हरभऱ्याला 31 हजार, बागायती हरभऱ्याला 36000, बागायती गव्हाला 45000, करडईला 32,400, सूर्यफुलाला 27 हजार 720, जवस कोरडवाहू पंचवीस हजार 200, भुईमूग 45 हजार 600, कांदा 87,600, बटाटा 87 हजार 600 प्रति हेक्टर असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा