रब्बी आणि रांगडा कांद्याच्या सुधारित जाती कोणत्या ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rabi Onion Farming : महाराष्ट्रात खरीप, लेट खरीप म्हणजेच रांगडा आणि रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारताच्या एकूण कांदा उत्पादनात आपल्या महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण कांदा उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक कांदा उत्पादन एकट्या रब्बी हंगामात घेतले जाते.

रब्बी हंगामात आपल्याकडे कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती होते. वास्तविक राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.

तथापि कांद्याच्या पिकातून चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

तसेच कृषी तज्ञांनी रब्बी आणि रांगडा हंगामासाठी कांद्याच्या सुधारित जाती कोणत्या आहेत याबाबत माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आता आपण रब्बी आणि रांगडा कांद्याच्या उपयुक्त जाती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

फुले समर्थ : कांद्याचा हा वाण खरीप आणि रांगडा हंगामात लावला जाऊ शकतो. या जातीचे पीक लागवडीनंतर 80 ते 90 दिवसात म्हणजेच तीन महिन्यांच्या काळातच तयार होते.

खरीप हंगामात 75 ते 85 दिवसात आणि रांगडा हंगामात 85 ते 100 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. खरीपातून अवरेज 25 टन आणि रांगडा कांद्याचे 30 ते 35 टन एवढे उत्पादन मिळू शकते. या कांद्याची साठवण क्षमता दोन ते तीन महिने एवढी आहे.

फुले सफेद : कांद्याचा हा एक सुधारित आणि पांढरा वाण आहे. जातीची रब्बी आणि रांगडा अशा दोन्ही हंगामात लागवड होऊ शकते. राज्यातील हवामान या जातीच्या कांद्याला विशेष मानवते. या कांद्यापासून हेक्‍टरी 20 ते 25 टन एवढे उत्पादन मिळते आणि कांद्याची साठवणूक क्षमता दोन ते तीन महिने एवढी आहे.

फुले सुवर्णा : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची खरीप, लेट खरीप म्हणजे रांगडा आणि रब्बी अशा तीनही हंगामात लागवड केली जाऊ शकते. पीक लागवड केल्यानंतर 110 दिवसात तयार होते. या जातीपासून हेक्टरी 23 ते 24 टन एवढे उत्पादन मिळते.

भीमा राज : रांगडा आणि रब्बी हंगामात या जातीच्या कांद्याची लागवड केली जाऊ शकते. या जातीचे पीक सरासरी 120 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून रांगडा हंगामात ४० ते ४५ टन,  रब्बी हंगामात २५ ते ३० टन एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा