Pune Vande Bharat Sleeper Train : गेल्या काही वर्षांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन भारत वासियांची लाडाची रेल्वे गाडी बनली आहे. भारतातील रेल्वे प्रवाशांना या गाडीची हाव आवरता आवरत नाहीये. ही गाडी देशवासियांच्या पसंतीस खरी उतरली असून देशातील विविध मार्गावर या गाडीला सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
भारतीय रेल्वे देखील प्रवाशांच्या मागणीला गांभीर्याने घेत असून देशातील विविध महत्त्वाच्या मार्गावर या ट्रेनला सुरू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वेने आत्तापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर या देशातील संपूर्ण भारतीय बनावटीच्या ट्रेनला सुरू केले आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मार्च 2024 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 75 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे कडून केला जाणार आहे. दस्तूर खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च 2024 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 75 होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे लवकरच ही संख्या दोनशेपर्यंत जाणार आहे. यामुळे देशातील विविध राज्यांना आता वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.
आपल्या राज्याला देखील लवकरच आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते अमरावती आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ला सुरू केले जाणार आहे. सध्या स्थितीला राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या 6 मार्गावर ही गाडी सुरू आहे. येत्या काही दिवसात ही संख्या 10 पर्यंत वाढवली जाणार आहे.
अशातच, आता महाराष्ट्रासाठी विशेषता पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. कारण की पुण्याला लवकरच वंदे भारत स्लीपर कोचची भेट मिळणार आहे. पुण्याहून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार आहे.
कोणत्या शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर
स्लीपर वंदे भारत ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन वरून चालवली जाणार आहे. सध्या पुण्याहुन एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. पण ती थेट पुणे रेल्वे स्थानकावरून सुटत नाही. मुंबई ते सोलापूर ही वंदे भारत ट्रेन पुणेमार्गे धावत आहे. परंतु आता पुणे रेल्वे स्थानकावरून थेट वंदे भारत स्लीपर कोच चालवली जाणार आहे.
ही गाडी बेंगलोर शहरासाठी सुरू होईल असे वृत्त प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे. पुणे ते बेंगलोर दरम्यान वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते बेंगलोरचा हा प्रवास आणखी गतिमान, जलद आणि सुरक्षित होणार आहे. विशेष बाब अशी की ही गाडी मार्च 2024 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये एकूण 16 कोच राहणार आहेत.
या 16 पैकी 11 कोचं एसी टियर राहतील ज्यामध्ये 611 सीटे असतील. तसेच 4 एसी टियर-2 कोचं असतील ज्यात 188 बर्थ असतील. तर एक फर्स्ट एसी कोच असेल ज्यात 24 बर्थ राहतील. म्हणजे या 16 कोचंमध्ये एकूण 823 सीट बसण्याची कपॅसिटी राहणार आहे. यामुळे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसमुळे लांब पल्ल्याचा प्रवास देखील जलद, सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे.