Pune To Kolhapur Railway : तुम्हीही पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करतात का? अहो मग थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा. रेल्वेने तुमच्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे ते कोल्हापूर दरम्यान चा प्रवास खूपच सोपा होणार आहे. खरे तर मध्य महाराष्ट्रातील या दोन्ही शहरा दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी पुण्यातील भाविक दररोज हजारांच्या संख्येने श्रीक्षेत्र कोल्हापूर नगरीत हजेरी लावत असतात. तसेच कोल्हापूर येथील जनता शिक्षण, पर्यटन, उद्योग, नोकरी अशा विविध कामांसाठी दररोज हजारोंच्या संख्येने पुण्यात येते.
मात्र या शहरादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे मध्य रेल्वेच्या माध्यमातून नोव्हेंबर 2023 मध्ये विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. खरे तर कोरोना काळापासून कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस बंद होती.
त्यामुळे कोल्हापूरहुन मुंबई आणि पुण्याला जाणे अवघड झाले होते. शिवाय मुंबई आणि पुण्याहून कोल्हापूरला जाणे देखील कठीण झाले. यामुळे सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू केली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
मात्र प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली नाही पण हिच सह्याद्री एक्सप्रेस विशेष एक्सप्रेस गाडी म्हणून कोल्हापूर ते पुणे दरम्यान चालवली जात आहे. आधी या गाडीच्या 56 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या होत्या.
मात्र या विशेष गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या माध्यमातून या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या पुणे ते कोल्हापूर अशा 92 आणि कोल्हापूर ते पुणे अशा 92 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या अतिरिक्त 184 फेऱ्या एक जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये चालवल्या जाणार आहेत. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष एक्सप्रेस ट्रेन कोल्हापूर येथून रात्री साडेअकरा वाजता सुटते आणि 7 वाजून 45 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर येते. तर पुण्यातून रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सोडली जाते आणि कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी पोहोचते.