Pune To Ayodhya : जानेवारी महिन्यात श्रीक्षेत्र अयोध्या येथे विकसित झालेले प्रभू श्री रामरायाचे मंदिर राम भक्तांसाठी खुले करण्यात आले. तब्बल पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे राम मंदिर राम भक्तांसाठी खुले झाले आहे. यामुळे संपूर्ण जगभरातील राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. अनेकजण श्री क्षेत्र आयोध्या येथे प्रभू श्री रामरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
मंदिर उद्घाटनानंतर श्रीक्षेत्र आयोध्याला भेटी देणाऱ्या रामभक्तांची संख्या वाढली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे अनेकजण रामरायाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत.
पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र अयोध्याला जात आहे. हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे ते आयोध्या दरम्यान आठवड्यातून एक दिवस ही गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या विशेष गाडीला प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात आहे.
हेच कारण आहे की या समर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून एकदा धावत होती. पण आता ही गाडी आठवड्यातून दोनदा धावणार आहे.
ही गाडी 31 मे 2024 पर्यंत चालवली जाणार असून या कालावधीत ही गाडी आठवड्यातून दोनदा सोडली जाणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे नवीन वेळापत्रक कसे आहे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे वेळापत्रक ?
गाडी क्रमांक 01455 म्हणजे पुणे-अयोध्या समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून शुक्रवार आणि मंगळवारी चालवली जाणार आहे. तसेच अयोध्या-पुणे समर स्पेशल ट्रेन म्हणजेच ट्रेन – क्रमांक 01456 ही गाडी आता आठवड्यातून प्रत्येक रविवार आणि गुरुवारी चालवली जाणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून ही गाडी शुक्रवारी आणि मंगळवारी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अयोध्याकडे रवाना होणार आहे. तसेच अयोध्या कँटवरून ही ट्रेन रविवार आणि गुरुवारी रात्री 03 वाजून 55 मिनिटांनी पुण्याकडे रवाना होणार आहे.
यामुळे पुण्याहून श्रीक्षेत्र आयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या असल्याने राम भक्तांचा प्रवास हा सोयीचा होणार आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाचे रामभक्तांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.