Pune Solapur National Highway : महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या कामाला मोठा वेग आला आहे. अशातच आता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, हा महामार्ग पुणे आणि सोलापूर दरम्यान वाहतुकीसाठी अति महत्त्वाचा आहे.
या मार्गिकेवर सातत्याने वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणे मोठे जिकरीचे बनले आहे. महामार्गावर प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचा अपघात झाला असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर अनेकांना अपंगत्व देखील आले आहे.
अशा परिस्थितीत महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तसेच स्थानिकांमध्ये शासनाविरोधात तसेच प्रशासना विरोधात रोष वाढत होता. नागरिकांमध्ये वाढलेला हा असंतोष खासदार अमोल कोल्हे यांना देखील जाणवत होता. परिणामी त्यांनी याची दखल घेतली आणि महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे एक मोठी मागणी केली.
त्यांनी गडकरी यांच्याकडे हडपसर ते उरळी कांचन यादरम्यान एलिव्हेटेड रस्ता उभारण्याची मागणी केली. साहजिकच एलिव्हेटेड रस्ता उभारणीसाठी अधिक वेळ खर्च होणार होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी महामार्गावरील किमान महत्त्वाची जंक्शन सुरक्षित करणे हेतू उपाययोजना करण्याची सूचना दिली होती.
खासदार महोदय यांच्या या सूचनेला अखेरकार गांभीर्याने घेतले गेले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी मार्ग म्हणजे अंडरपास उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. उरुळी कांचन (कि.मी. 28 / 910), लोणी (कि.मी. 17 / 500) आणि थेऊर फाटा ( कि.मी. 20/280 ) या ठिकाणी हे सदर अंडरपास तयार होणार आहेत. या अंडरपासमुळे महामार्गावर होणारे अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील, यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल.
एवढेचं नाही तर स्थानिकांना आणि पादचाऱ्यांना यामुळे सुरक्षा प्रदान होणार आहे. एकंदरीत शिरूर हवेलीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून यामुळे नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे. यामुळे येत्या काही दिवसात पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना सुरक्षिततेची अनुभूती होणार आहे.