Pune Ring Road :- पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतुकीची समस्या दूर व्हावी याकरिता प्रस्तावित रिंग रोडच्या पूर्व आणि पश्चिम भाग असे दोन भाग करण्यात आले असून यामध्ये पश्चिम भागाचा रिंग रोड पाच टप्प्यात तर पूर्व भागाचा रिंगरोड चार टप्प्यात विकसित केला जाणार आहे. हा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्यात येणार असून सध्या यासाठीचे भूसंपादनाचे काम सुरू आहे.
या रिंग रोड साठी 15000 कोटी रुपये एकूण बांधकामासाठी तर 12000 कोटी रुपये यासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी लागणार आहेत. असेल यातील 31 किलोमीटरचा जो टप्पा आहे त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा अनुषंगाने आपण या रिंग रोड साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाविषयी एक महत्वाची माहिती घेणार आहोत. या रिंगरोडसाठी स्वतःहून जमीन देणाऱ्यांना मिळेल अतिरिक्त मोबदला
एमएसआरडीसीच्या प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादला येत्या जुलै महिन्यापासून सुरुवात होणार असून त्याकरिता आवश्यक ज्या काही महत्वपूर्ण प्रक्रिया आहे त्या देखील सुरू करण्यात आलेले आहेत. या रिंग रोडच्या पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकन देखील पूर्ण करण्यात आले असून आता यामध्ये बाधित होणाऱ्या जमीन मालकांना जो मोबदला देण्यात येणार आहे. त्या जमीन मालकांना जमीन ताब्यात घेण्याबाबतच्या नोटीस देखील जून महिन्याच्या अखेर पासून पाठवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
यामध्ये 172 किलोमीटर आणि 110 मीटर रुंद असलेल्या या रिंग रोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून एकूण 26 हजार आठशे कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित असून करिता आवश्यक मूल्यांकन प्रक्रिया राबवण्यात आली असून हे मूल्यांकन प्रक्रिया गेल्या तीन वर्षातील ज्या काही खरेदी विक्रीची व्यवहार संबंधित भागात झाले आहेत ते गृहीत धरून करण्यात आले आहेत.
परंतु मागील तीन वर्षांपूर्वी जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार झाले ते कोरोना कालावधीमुळे खूप कमी प्रमाणात झाले असल्यामुळे या प्रकल्पासाठी ज्या काही जमिनीत देण्यात येणार आहेत त्यांचा दर हा खूप कमी होत असल्याचा आक्षेप देखील घेण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आता गेल्या पाच वर्षातील जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार गृहीत धरून त्या पद्धतीने मूल्यांकन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळेच पश्चिम भागातील गावांचे फेरमूल्यांकन पूर्ण करण्यात आले असून आता पूर्व भागातील गावांचे मूल्यांकन करणे बाकी आहे. पूर्व भागातील देखील मूल्यांकन आता अंतिम टप्प्यात असून त्यानंतर बाधितांना मोबदला देण्यात येणार आहे. तसेच या महिन्याच्या शेवटी प्रकल्पग्रस्तांची किती जमीन संपादित केली जाणार आहे व त्यांना किती मोबदला मिळणार आहे याबाबतच्या नोटिसा देखील पाठवण्यात येणार असून त्यानुसार आता भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी जे जमीन मालक स्वतःहून जमीन देतील त्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
पुणे रिंगरोडचे स्वरूप
या रिंग रोडचे एकूण लांबी साधारणपणे 136.80 किलोमीटर असून त्याचा एकूण खर्च 15000 कोटी रुपये आहे. यामध्ये पूर्व भागाचे काम हे चार टप्प्यात तर पश्चिम भागाचे काम हे पाच टप्प्यात करण्यात येणार आहे.