गुड न्युज ! पुणे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची दिवाळी; ‘या’ गावातील जमीनधारकांना हेक्टरी 6 कोटी 11 लाखाचा मोबदला, केव्हा सुरू होणार बांधकाम ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road Latest Update : पुणे रिंग रोड बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. खरतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिशय महत्त्वाचा असा पुणे बाह्यवळण रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जाणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा प्रकल्प संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एम एस आर डी सी ने हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या प्रकल्पासाठी जमिनीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाकडून यासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. यानुसार पुणे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी अंतिम दर निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता येत्या काही महिन्यात या प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.

कसा आहे पुणे रिंग रोड प्रकल्प ?

पुणे बाह्य वळण रस्ता 172 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याची रुंदी 110 मीटर एवढी आहे. हा रस्ता पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. या मार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पूर्व भागात मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांमध्ये रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांमधून रस्ता प्रस्तावित केला आहे.

जमिनीचे भूसंपादन सुरू

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी जमिनीचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. सध्या या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. यानुसार जमिनीचे दर अंतिम झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पूर्व भागातील खेड तालुक्यातील बारा गावांसाठी जमिनीचे दर अंतिम करण्यात आले आहेत.

खालुंबे, निघोज, माई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, चर्‍होली खुर्द, धानोरा, मरकळ, सोळू, गोलेगाव या बारा गावांसाठी जमिनीचे दर ठरवण्यात आले आहेत. चिंबळी गावातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 6 कोटी 11 लाख, खालुंबे गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 34 लाख, चर्‍होली गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 90 लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे.

यामुळे पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी होणार असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी हे जमिनीसाठी ठरवण्यात आलेले दर जे शेतकरी संमतीने जमिनी देतील त्यांच्यासाठीच लागू राहणार आहेत. समतीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला दिला जाणार आहे.

रिंग रोडचे बांधकाम केव्हा सुरू होणार?

या प्रकल्पासाठी जमिनीचे मूल्यांकन पूर्ण झाले असून सध्या जमिनीचे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. आगामी काही महिन्यात जमिनीचे संपादन पूर्ण होणार आहे. यानंतर या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढली जाणार आहे. यामुळे जानेवारीअखेरपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा