Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.
पुणे रिंग रोडचा हा प्रोजेक्ट असून यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी बहुतांशी कमी होणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि शासन करत आहे. दरम्यान आता या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत आणि प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल याबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे.
रिंग रोड बाबत एमएसआरडीसी चे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर दिलेल्या माहितीनुसार पुणे रिंग रोडचं काम हे ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तसेच वसईकर यांनी सुरुवातीला या प्रकल्पाचा नासिक नगर व सोलापूर महामार्गाला जोडणारा भाग बांधला जाणार आहे. खरं पाहता, पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी दहा हजार कोटीहून अधिक ची गरज भासणार आहे.
अशा परिस्थितीत या प्रकल्पासाठी हुडकून 10000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. यासाठी शासनाने हमी देखील दिली आहे. या दहा हजार कोटी रुपयांपैकी 3500 कोटी रुपये हुडकोच्या माध्यमातून pune puneमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्राप्त झाले आहेत. यामुळे आता भूसंपादनाच्या कामाला वेग येणार आहे. पुणे रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर मोबदला मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या रिंग रोड प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण 78 गावात भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष बाब अशी की यापैकी 42 गावांमध्ये जमिनीचे निवाडे देखील पूर्ण झाले आहेत. एवढेच नाही तर त्या ठिकाणी जमीन मूल्यांकन समितीच्या माध्यमातून जमिनीचे अंतिम दर देखील निश्चित झाले आहेत. जमिनीचे अंतिम दर ठरवताना शेतकऱ्यांना विचारात घेतले गेल आहे.
विशेष बाब म्हणजे उर्वरित गावांमध्येही लवकरात लवकर जमिनीचे निवाडे हे पूर्ण होणार आहेत. यासाठी, आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पुणे रिंग रोड साठी लागणारां खर्चाचा पैकी दहा हजार कोटी रुपये हुडको कडून कर्ज घेतलं जाणारा आहे. यासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर या दहा हजार कोटी पैकी साडेतीन हजार कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित निधी देखील टप्प्याटप्प्याने महामंडळाला मिळणार आहे. दरम्यान आता साडेतीन हजार कोटी रुपये महामंडळाला मिळाले असल्याने जमीन संपादित झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देखील लवकरच मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला पश्चिम रिंग रोड साठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू असून आता मार्चअखेर पश्चिम रिंग रोडचे जमीन संपादनाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. याशिवाय पूर्व रिंग रोडचे जमीन संपादनाचे काम हे मे अखेर पूर्ण करण्याच टारगेट आहे. मे अखेर जमीन संपादनाचे काम पूर्ण होणार असले तरीदेखील प्रत्यक्षात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महामार्गासाठी आवश्यक जमीन महामंडळाच्या ताब्यात येणार आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात निविदा प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
मात्र त्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्यात रिंग रोडचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर या रिंग रोडचे काम सुरू केल जाणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून या रिंग रोडचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. पुणे रिंग रोड साठी दहा हजार 520 कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार आहेत. तसेच बांधकामासाठी 17 हजार 723 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
म्हणजे 28 हजार 843 कोटी रुपये एकूण खर्च या प्रकल्पाला लागणार आहे. निश्चितच भूसंपादनासाठी आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने भूसंपादनाच्या कामाला आता गती लाभली असून लवकरात लवकर या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन होणार असून प्रत्यक्ष काम देखील लवकर सुरू करण्याचा मानस महामंडळाचा आहे.