पुणे रिंग रोडबाबत महत्वाचे अपडेट ! भूसंपादनासाठी होणार ड्रोनचा वापर, जमिनधारकांना मिळणार अचूक मोबदला, कसं काम करणार ड्रोन ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षात वाढत्या शहरीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. यामुळे शहरातील नागरिक मात्र परेशान होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे शहरात एक-दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी देखील तासाभराचा कालावधी खर्च करावा लागत आहे.

हेच कारण आहे की शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात एम एस आर डी सी कडून एक आणि पीएमआरडीएकडून एक असे दोन रिंग रोड तयार केले जाणार आहेत. सध्या स्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या 172 किलोमीटर लांबीच्या आणि 110 मीटर रुंदीच्या रिंग रोड साठीचे भूसंपादन प्रगतीपथावर आहेत. या रिंग रोडचे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात काम होत असून पश्चिम भागातील भूसंपादन बऱ्यापैकी पूर्ण होत आले आहे.

आता पूर्व भागातील रिंग रोडच्या भूसंपादनासाठी देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असून यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पूर्व रिंग रोडसाठी लवकरच निधी उपलब्ध होईल आणि त्यानंतर पूर्व भागातील रिंग रोडचे भूसंपादन देखील पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशातच आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या रिंग रोड बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीएमआरडीएच्या रिंग रोडच्या भू संपादनासाठी आता ड्रोनचा वापर केला जात आहे. भूसंपादन तसेच अचूक नियोजनासाठी याचा वापर सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे या ड्रोनच्या वापराने आतापर्यंत 45 किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

यामुळे प्रकल्पाच्या वेळेत आणि खर्चात बचत होणारा असा आशावाद व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर यामुळे भूसंपादन करताना जमीन धारकांना अचूक मोबदला मिळणार आहे. या रिंग रोड साठी खेड तालुक्यातील सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावात भूसंपादनासाठी मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आता भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे रिंगरोडसाठीचे सर्वेक्षण अचूक होणार आहे. हा रिंग रोड ज्या भागातून जात आहे त्या जमिनीवरील इमारती, गोठे, घर, विहीर, झाडे यांची आता अचूक माहिती मिळणार आहे. यामुळे संबंधितांना त्या आधारावर मोबदला मिळणार आहे. पूर्वी हे सर्वेक्षण करण्यासाठी स्थळ पाहणी केली जात असे मात्र आता ड्रोनमुळे स्थळ पाहणी करण्याचे काम राहणार नाही. पीएमआरडीकडे आधी दोन ड्रोन होते.

पण रिंग रोडच्या कामासाठी नवीन रोड खरेदी करण्यात आला आहे. हा नवीन ड्रोन एका उड्डाणात 70 ते 80 हेक्टरची मोजणी किंवा सर्वेक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकदा चार्ज केले तर जवळपास 45 मिनिटे हा ड्रोन चालतो. यामुळे आता भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार असून अचूक सर्वेक्षण होणार आहे.

बाधित शेतकऱ्यांना यामुळे अचूक मोबदला मिळेल असा आशावाद देखील व्यक्त होत आहे. एकंदरीत पीएमआरडीएच्या या निर्णयामुळे आता रिंग रोडच्या भूसंपादनाला गती मिळणार असून लवकरात लवकर संपादन पूर्ण होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा