Pune Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिवाळीच्या काळात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी राहणार आहे.
जसं की आपणास माहीतच आहे की, कोरोना काळात भारतीय रेल्वेने विविध मार्गावरील एक्सप्रेस ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस देखील बंद करण्याचा निर्णय झाला होता.
मात्र ज्यावेळी कोरोनाचे सावट देशातून निवळले त्यावेळी भारतीय रेल्वेने बंद करण्यात आलेल्या बहुतांशी एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू केल्यात. पण सह्याद्री एक्सप्रेस रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली नाही.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही एक्सप्रेस बंद झाल्यामुळे मुंबई आणि पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.
म्हणून ही गाडी लवकरात लवकर सुरू केली गेली पाहिजे अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी लावून धरली होती. यासाठी रेल्वे कडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा देखील करण्यात आला.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रेल्वे विभागाकडे ही गाडी सुरू करण्यासाठी दबाव तयार करण्यात आला. याचा परिणाम म्हणून ही एक्सप्रेस आता पुन्हा एकदा नव्याने रुळावर धावू लागली आहे.
काल अर्थातच 4 नोव्हेंबर 2023 पासून ही गाडी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र ही गाडी कोल्हापूर ते मुंबई पर्यंत थेट न चालवता कोल्हापूर ते पुणे पर्यंत चालवण्याचा निर्णय झाला आहे.
दिवाळीच्या काळातच सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
कस राहणार सह्याद्री एक्सप्रेसचे वेळापत्रक
कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून साडेअकरा वाजता पुण्याच्या दिशेने रवाना होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचते. तसेच पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस रोज रात्री पावणेदहा वाजता पुणे येथून निघते आणि पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचते.
सह्याद्री एक्सप्रेस कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर, वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, नीरा, जेजुरी, पुणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.