पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणेकरांच्या या वीकेंडला थोड्याशा अडचणी वाढणार आहेत. खरंतर विकेंड म्हटलं की अनेकजण फिरण्याचा प्लॅन बनवतात. वीकेंडला आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या देखील वाढते. मात्र पुणेकरांना हा विकेंड बाहेर स्पेंड करण्यासाठी जाताना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कारण की, पुण्यातील काही रेल्वे गाड्या तांत्रिक अडचणींमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. चिंचवड ते खडकी स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे रविवारी पुण्यातुन सुटणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या रद्द राहणार असल्याचे महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे निश्चितच रविवारी पुणेकरांना रेल्वे प्रवासादरम्यान अडचणीचा सामना करावा लागणार आहे. रेल्वेने रविवारी तब्बल 24 लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा लोकल रेल्वे गाड्या आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बारा लोकल रेल्वे गाड्या रद्द राहणार आहेत.

खरतर सुट्टीच्या दिवशी पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोणावळ्याला जातात. पण या वीकेंडला लोणावळ्याला जर कोणाचा प्लॅन असेल तर या प्लॅनवर पावसाळ्याचा पाऊस तर पाणी फिरवणार नाही मात्र लोकल ट्रेन पाणी फिरवू शकते.

कोणत्या गाड्यां राहणार रद्द 

रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल ट्रेन सोबतच काही एक्सप्रेस ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे – लोणावळा, पुणे – तळेगाव डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या ट्रेन रविवारी चालवल्या जाणार नाहीत.

या महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेन रविवारी रद्द राहणार आहेत. यामुळे या एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यातून धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि काही एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्या असल्याने आता रेल्वे प्रवाशांना पर्यायी गाड्यांचा वापर करावा लागणार आहे. अन्यथा रस्ते मार्गाने प्रवास करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.