पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्टेशनंचा कायापालट होणार, 38.54 कोटी रुपयांची तरतूद, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या शहरात विविध पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे शहराला मेट्रोची भेट मिळाली आहे. शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे. यामुळे पुण्यातील नागरिकांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. पुणेकरांनी मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दाखवला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे पुणेकरांना रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाची देखील लवकरच भेट मिळणार आहे. या मार्गावर नुकतीच मेट्रोची यशस्वी ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे शहरातील विविध रेल्वे स्थानकांचा केंद्र शासनाच्या माध्यमातून कायापालट केला जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र शासनाने अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

यामध्ये पुण्यातील काही रेल्वे स्थानकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तळेगाव रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी 38.54 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे पुण्यातील हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक लवकरच वेगळ्या रंगात पाहायला मिळणार आहेत. खरंतर केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या एकूण 76 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तळेगाव, आकुर्डी आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.यानुसार रेल्वे प्रवाशांसाठी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तीन लिफ्ट बनवल्या जाणार आहेत.

यासोबतच शौचालय, वेटिंग रूम, दोन एक्सलेटर उभारले जाणार आहेत. याशिवाय ओव्हर ब्रिज, लिफ्ट इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे या स्थानकांचे संपूर्ण रुपडे बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.