Pune Railway News : नववर्ष सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांना मोठी भेट मिळाली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे नववर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभागाने पुण्याहून विदर्भाकडे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल केला आहे.
अमरावती-पुणे आणि अमरावती-अजनी या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल झाला असून आता या दोन्ही गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहेत.
या दोन्ही गाडीला आता वाढीव १ स्लीपर आणि १ एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच जोडला जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
खरे तर पुण्याहून अमरावतीला आणि अमरावतीहून पुण्याला येणाऱ्यांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. शिक्षणानिमित्त आणि रोजगार निमित्त विदर्भातून मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात येत असतात.
त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये कायमच मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे या एक्सप्रेस ट्रेनला अधिकचे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून या निर्णयाचा या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या दोन्ही गाड्यांमध्ये आता जनरेटर- १, स्लीपर- २, एसी चेअर कार- १, नॉनएसी चेअर कार-१०, एसी थ्री टायर इकॉनॉमी- १ आणि गार्ड ब्रेक यान-२ असे एकूण १६ एलएचबी कोच राहणार आहेत.
निश्चितच रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अमरावती ते अजनी आणि अमरावती ते पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायद्याचा राहणार आहे.
यामुळे विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होईल याबाबत जाणून घेणार आहोत.
पुणे-अमरावती एक्स्प्रेसमध्ये आज अर्थातच शनिवारपासून, अमरावती-पुणे एक्स्प्रेसमध्ये कालपासून, अमरावती-अजनी एक्स्प्रेसमध्ये आजपासून, अजनी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये आजपासून बदल होणार आहे.