पुणेकरांसाठी गुड न्यूज ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार विशेष गाडी, कस राहणार वेळापत्रक ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : महाराष्ट्रसहित संपूर्ण देशभरात लवकरच गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. गणेश उत्सव संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशोत्सवाचा आरंभ होतो आणि अनंत चतुर्थी पर्यंत गणेशोत्सवाचा पावन पर्व सुरू राहतो. या काळात संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण राहते.

मुंबई आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी परततात. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणार आहेत. अशा परिस्थितीत पुणे रेल्वे मंडळाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे मंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. याचाच अर्थ 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान हा सण साजरा करण्यासाठी पुण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जाणार आहेत. यामुळे पुणे रेल्वे मंडळाने 15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकातुन कोकणातील कुडाळ रेल्वे स्थानकापर्यंत गणपती विशेष गाडी चालवण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच कुडाळ स्थानकावरुन पुणे रेल्वे स्थानकादरम्यान 17 सप्टेंबर, 24 सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी गणपती विशेष गाडी चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गणपती विशेष गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून वर नमूद केलेल्या तारखांना सायंकाळी सव्वा सहा वाजता कुडाळच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच कुडाळ रेल्वे स्थानकावरून ही गणपती विशेष गाडी वर नमूद केलेल्या तारखांना दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकाकडे रवाना होणार आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही गणपती विशेष गाडी आपल्या प्रवासादरम्यान लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेळ, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग या अति महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. निश्चितच पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी या गणपती विशेष गाड्या विशेष फायदेशीर ठरणार यात शंकाच नाही.