Pune Railway News : पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखतात. हे देशातील एक महत्त्वाचे शहर असून अलीकडे आयटी हब म्हणून विकसित होत आहे. वेगाने विकसित होत आहे. म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील कानाकोपऱ्यातून कामानिमित्त आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील इतरही राज्यातून आलेल्या नागरिकांनी विद्येचे माहेरघर म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या पुणे शहरात कामानिमित्त आपले बस्तान बसवले आहे.
यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातून आलेल्या भैय्या लोकांची संख्या देखील खूपच अधिक आहे. अलीकडे वेगाने विकसित झालेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील युपीवासीयांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान शहरात शिक्षणासाठी, व्यापारासाठी तसेच कामासाठी स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थी, व्यापारी आणि कामगार वर्गांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे युपी मधील लोकांना उत्तर प्रदेश राज्यात जलद गतीने आणि स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी पुणे रेल्वे विभागाने एका अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावरून लवकरच जन साधारण एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही एक्सप्रेस ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून अलाहाबाद रेल्वे स्थानकादरम्यान धावणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे देशभरात एकूण 25 जनसाधारण एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे. ही एक्सप्रेस ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसला पर्याय राहणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांना जलद गतीने आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहेत. विशेष म्हणजे या गाडीचे तिकीट दर इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत प्रामुख्याने वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहतील असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान या 25 जनसाधारण एक्सप्रेस मध्ये पुणे ते अलाहाबाद दरम्यान धावणाऱ्या जनसाधारण एक्सप्रेसचा देखील समावेश राहणार आहे. यामुळे पुणे ते अलाहाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्तात आणि सुरक्षित तसेच जलद गतीने प्रवास करता येणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कशी राहणार पुणे ते अलाहाबाद जनसाधारण एक्सप्रेस
हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या जनसाधारण एक्स्प्रेस गाडीत एकूण 24 कोच उपलब्ध करून दिले जातील. यात ११ कोच नॉन एसी स्लिपर आणि ११ जनरल कोच राहणार आहेत. तसेच या गाडीचे तिकीट दर हे कमी राहतील यामुळे सर्वसामान्यांना देखील या गाडीचा फायदा होणार आहे.
ही पुणे ते अलाहाबाद दरम्यान धावणारी गाडी साप्ताहिक गाडी म्हणून चालवली जाणार अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. म्हणजे ती गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागाने तयारी देखील सुरू केली आहे.