Pune Railway News : दिवाळी सणाच्या काळात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, दिवाळीच्या काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून देखील विविध प्रयत्न केले जात आहेत.
वेगवेगळ्या मार्गांवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सणासुदीच्या काळात आरामदायी आणि जलद झाला आहे.
अशातच आता राज्यातील विशेषता पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या पुण्याहून धावणाऱ्या एका विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना दिवाळीच्या काळात मोठा दिलासा मिळेल अस बोलले जात आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते हटिया दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
या विशेष ट्रेनच्या 10 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या माध्यमातून यावेळी घेण्यात आला आहे. यामुळे या रेल्वे मार्गावर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
दरम्यान पुणे ते हटिया दरम्यान सुरू करण्यात आलेली ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार आहे अर्थातच ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. या गाडीच्या एक डिसेंबर पर्यंत 10 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
कस असेल वेळापत्रक ?
पुणे ते हटिया विशेष एक्सप्रेस ट्रेन एक डिसेंबर पर्यंत दर शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी पावणे अकरा वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता हटीया येथे पोहोचणार आहे.
तसेच हटिया ते पुणे एक्सप्रेस 29 नोव्हेंबर पर्यंत चालवली जाणार असून ही गाडी या कालावधीमध्ये दर बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हटिया रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2:45 वाजता ही गाडी पुण्याला पोहोचेल.
कुठे मिळणार थांबा ?
ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी या कालावधीत दौंड कार्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला या रेल्वेस्थानकावर थांबा घेणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.