Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणेकरांसाठी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे सर्वच ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपल्या मूळ गावी जात आहेत.
यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसांडून वाहत आहे. विविध रेल्वे मार्गावरील गाड्या हाउसफुल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, प्रवाशांची उन्हाळी सुट्ट्यांमध्ये झालेली ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत.
अशीच एक विशेष गाडी दौंड ते राजस्थान येथील अजमेर दरम्यान चालवली जाणार आहे. ही उन्हाळी विशेष गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. या साप्ताहिक गाडीमुळे पुण्याहून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांना तथा राजस्थानहुन पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दौंड-अजमेर उन्हाळी विशेष ट्रेन (गाडी क्रमांक 09658) ही सुपरफास्ट साप्ताहिक गाडी कालपासून रुळावर धावत आहे. ही गाडी 29 एप्रिल ते 1 जुलै या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर सोमवारी दौंड येथून रात्री 11.10 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08.35 वाजता अजमेरला पोहोचणार आहे.
दौंड-अजमेर उन्हाळी विशेष ट्रेनच्या 10 फेऱ्या होणार आहेत. तसेच, अजमेर-दौंड उन्हाळी विशेष ट्रेन (गाडी क्रमांक 09657) दिनांक 28 एप्रिल ते 30 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर रविवारी अजमेर येथून सोडली जाणार आहे. येथून ही ट्रेन सायंकाळी 07.55 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.20 वाजता दौंड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेनला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर आणि नसीराबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
यामुळे या एक्सप्रेस ट्रेन चा राज्यातील अनेक भागांमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून त्यांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.