पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसाय रूट? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणेकरांसाठी रेल्वे विभागाने दिवाळीच्या काळात विविध मार्गांवर विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध शहरांसाठी विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता.

पुणे ते अमरावती दरम्यान देखील विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले होते. यामध्ये पुणे अमरावती विशेष एक्सप्रेस ट्रेन 24 नोव्हेंबर पर्यंत आणि अमरावती पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन 26 नोव्हेंबर पर्यंत चालवण्याचा निर्णय झाला होता.

मात्र दिवाळीचा काळ उलटला असतानाही या मार्गावर प्रवाशांची गर्दी कमी होत नाहीये. मार्गावरील प्रवाशांनी या विशेष एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद दाखवला होता.

परिणामी नागरिकांच्या सोयीसाठी या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय मध्ये रेल्वेने नुकताच घेतला आहे. यानुसार आता ही गाडी एक जानेवारी 2024 पर्यंत धावणार अशी माहिती समोर आली आहे.

कसं राहील नवीन वेळापत्रक 

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.ही गाडी या कालावधीमध्ये शुक्रवारी आणि रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

Pune Railway स्टेशनंवरून ही गाडी रात्री १०:५० वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजून 30 मिनिटांनी ही गाडी अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसला 1 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ही गाडी या कालावधीत आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.

ही Train सोमवार आणि शनिवारी अमरावती रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दिवशी ही ट्रेन सायंकाळी ७:५० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वे आहे.

कुठे मिळणार थांबा 

या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा दिला जाणार आहे. ही ट्रेन उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा