Pune Railway News : रेल्वे मंत्रालयाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील पुणे, विदर्भ आणि खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर राहणार आहे. कारण की, रेल्वे मंत्रालयाने पुण्याहून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने पुणे ते भुसावळ दरम्यान सुरू असलेली गाडी आता थेट अमरावती पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर पुणे ते भुसावळ ही एक्सप्रेस गाडी नाशिक मार्गे धावत होती. त्यामुळे नाशिककरांचा पुण्याकडील प्रवास अधिक गतिमान झाला होता. नाशिककरांना रेल्वे मार्गाने पुण्यात येणे सोपे झाले होते.
पण आता रेल्वे मंत्रालयाने ही गाडी अमरावतीला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिककरांचा पुण्याकडील प्रवास प्रभावित होण्याची शक्यता आहे. म्हणून रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर नाशिक शहरातील रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
विविध प्रवासी संघटनांच्या माध्यमातून शासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारी असल्याचे म्हटले आहे. पण या निर्णयाचे अमरावती, विदर्भ आणि संपूर्ण खानदेशमधील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, 13 नोव्हेंबर 2023 पासून पुणे-अमरावती एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे.
दोन दिवसापूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही गाडी आता प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधेसाठी ही गाडी अमरावती पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुणे ते अमरावती हा प्रवास गतिमान होणार आहे. विदर्भातील आणि खानदेशातील रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक जाणून घेऊया.
कसं असेल वेळापत्रक
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गाडी क्र. ११०२६ ही पुणे ते अमरावती दरम्यान चालवली जात आहे. ही एक्स्प्रेस गाडी १३ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी पुणे येथून ११.०५ वाजता सुटत आहे आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचत आहे.
तसेच गाडी क्र. ११०२५ ही ट्रेन अमरावती ते पुणे या मार्गावर चालवली जात आहे. ही एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून अमरावती येथून रात्री १० वाजून ५० वाजता सुटत आहे आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचत आहे.
कोणत्या स्थानकावर घेणार थांबा
रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, ही गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे अहमदनगरसह खानदेश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून या भागातील नागरिकांना आता जलद गतीने पुण्यात येता येणार आहे.