Pune PMPL Bus Service : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेसचा सर्वाधिक वापर केला जातो. ज्याप्रमाणे राजधानी मुंबईमधील लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते त्याच धर्तीवर पुण्यातील पीएमपीएलच्या बसेसला देखील पुण्याची लाईफ लाईन म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
कारण की पुण्यातील नागरिकांना शहरात प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेस शिवाय दुसरा कोणताच सोयीचा पर्याय नाही. शहरात मेट्रो सुरू झाली आहे मात्र अजूनही प्रत्येकच भागाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही.
शहरात सर्व दूर मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीसाठी आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत मात्र शहरात प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेसच योग्य पर्याय ठरणार आहे. दरम्यान, पीएमपीएलच्या बससेवेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट हाती आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पीएमपीएलच्या रातराणी बसच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. रातराणीच्या बसवाहक आणि चालकांसाठी कामाची वेळ आता रात्री साडेनऊ ते सकाळी सहा अशी करून देण्यात आली आहे.
या बदललेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या तीन दिवसात अर्थातच 18 डिसेंबर 2024 पासून होणार आहे. सध्या स्थितीला शहरातील 5 मार्गांवर रातराणी बस चालवली जात आहे. या मार्गांवर रोज रात्री एक ते दीड तासाने बस चालवली जात आहे. रोजाना एक मार्गावर साधारणता आठ फेऱ्या होत आहेत.
विशेष म्हणजे रातराणीच्या बसला शहरातील नागरिकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद देखील दिला जात आहे. या बसेसमुळे शहरातील नागरिकांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित आणि जलद झाला आहे. तथापि रातराणीचे तिकीट दर हे पाच रुपये अधिक आहे. आता आपण रातराणी बसेसचे वेळापत्रक थोडक्यात पाहणार आहोत.
- कात्रज ते वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) या मार्गावर रात्री १०.४०, मध्यरात्री १२.१५, पहाटे २.२०, ३.५५ आणि ५.२० वाजता बस चालवली जात आहे.
- वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) ते कात्रज या मार्गावर रात्री ११.३०, मध्यरात्री १, पहाटे ३.१० आणि ४.४० वाजता बस चालवली जात आहे.
- कात्रज ते पुणे स्टेशन (मोलिदिना स्थानक) या मार्गावर रात्री ११, मध्यरात्री १२.३०, पहाटे २, ३.२५, आणि ५ वाजता बस सेवा उपलब्ध आहे.
- पुणे स्टेशन ते कात्रज या मार्गावर देखील रातराणी बस उपलब्ध आहे. या मार्गांवर रात्री ११.५०, मध्यरात्री १.२०, २.४०, पहाटे ४.१० वाजता बसेस उपलब्ध आहेत.
- हडपसर ते स्वारगेट या मार्गावर रात्री १०.५०, ११.४०, मध्यरात्री १, पहाटे ३.४५ आणि ५ वाजता रातराणी बस सेवा उपलब्ध आहे.
- स्वारगेट ते हडपसर या मार्गावर रात्री ११.५० मध्यरात्री १२.२०, पहाटे १.४०, ४.१५ वाजता बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- हडपसर ते पुणे स्टेशन या मार्गावर १०.४०, मध्यरात्री १२, पहाटे २.५०, ४.०५ आणि ५.१५ वाजता बस उपलब्ध होते.
- पुणे स्टेशन ते हडपसर या मार्गावर सुद्धा रात राणीची सेवा उपलब्ध आहे, या मार्गांवर ११.२०, मध्यरात्री १२.४०, पहाटे ३.२५ आणि ४.३५ वाजता बस उपलब्ध होत आहे.
- पुणे स्टेशन ते एनडीए गेट या मार्गावर रात्री १०, मध्यरात्री १२.३०, पहाटे ३.४५, ६.१५ वाजता रातराणी बस उपलब्ध होते.
- एनडीए गेट ते पुणे स्टेशन या मार्गावर रात्री ११.१५, मध्यरात्री १.४५, पहाटे ५ वाजता बस उपलब्ध आहे.