पुणेकरांसाठी खुशखबर ! पीएमपी शहरातील ‘या’ मार्गावर सुरु करणार सुपरफास्ट बससेवा, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune PMP Bus Latest News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर पुण्याला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून हे शहर संपूर्ण जगात ख्यातनाम बनले आहे.

मात्र अलीकडे शहरातील वाढलेली लोकसंख्या आणि खाजगी वाहनांची वाढती संख्या पाहता हे शहर वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे शहरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पुणेकरांना जलद प्रवास अनुभवता यावा यासाठी शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम सुरू आहे.

मेट्रोच्या पाठोपाठ आता पीएमपीच्या बससेवेला देखील सुपरफास्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे शहरात सध्या स्थितीला चार मार्गावर विनाथांबा, विनावाहक बससेवा चालवली जात आहे. ज्याप्रमाणे नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेट्रोमार्गांना प्रवाशांनी पसंती दाखवली तशीच पसंती या चार मार्गावरील ‘विनाथांबा, विनावाहक’ बस सेवेला पुणेकरांनी दाखवला आहे.

विशेष म्हणजे या बससेवेमुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचत आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी पीएमपीने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएमपीने शहरातील तब्बल 200 मार्गांवर विना थांबा विनावाहक बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे कोणत्या मार्गांवर बस सेवा चालवली पाहिजे याचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेल्या मार्गावर बस सेवा चालवली जाणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या बस सेवेमुळे प्रवाशांचा 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार असा दावा केला जात आहे.

ही सेवा येत्या महिन्याभरात प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. सध्या चार मार्गावर ही सेवा सुरू असून 200 मार्गांवर ही सेवा विस्तारण्याचे काम पीएमपीने हाती घेतले आहे. आतापर्यंत 20 मार्गांची निवड झाली असून आगामी काही दिवसात इतरही मार्गांची निवड होणार आहे. या विनाथांबा, विनावाहक बससेवेअंतर्गत बस सुटण्यापूर्वीच चालक प्रवाशांना तिकीट देणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा