पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! ‘हा’ मार्ग होणार चौपदरी, कोणत्या भागातील नागरिकांना मिळणार दिलासा, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत शिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील राहणार आहेत.

अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हडपसर ते दिवे घाट या मार्गावर दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत तसेच या मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

खरेतर हडपसर ते दिवे घाट या मार्गावर मोठ्या प्रमाणातखड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मार्ग दुरुस्त केला गेला पाहिजे आणि याचे चौपदरीकरण झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा केला होता.

आता मात्र सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. कारण की, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने हडपसर ते दिवे घाट या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आणि चौपदरीकरणासाठी 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्यामुळे आता या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होणार आहे. यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी आता बऱ्यापैकी दूर होईल आणि नागरिकांना जलद गतीने प्रवास करता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

या भागात रस्ता खूपच कमी रुंदीचा असल्याने आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना अगदी जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत होते.

आता मात्र वाहनाचालकांची ही तारेवरची कसरत दूर होणार आहे आणि त्यांना अगदी सजतेने प्रवास करता येणार आहे.

यामुळे प्रवासाच्या वेळेत तर बचत होणारच आहे शिवाय अपघातांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कपात येणार आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या कामासाठी निधीची तरतूद केली असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा