आनंदाची बातमी ! पुणे जिल्ह्यातील ‘हा’ रस्ता होणार चौपदरी, 792.39 कोटी रुपयांची मंजुरी, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये रस्ते विकासाच्या कामांना विशेष गती मिळाली आहे. सध्या राज्यात रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत.अर्थातच येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुकांचा थरार रंगणार आहे.

अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या विकास कामांना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही प्रकल्पाच्या कामांना मंजुरी मिळत आहे तर काही प्रकल्पांच्या कामासाठी निधीची तरतूद करून दिली जात आहे.

तसेच ज्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच्या लोकार्पणासाठी देखील लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशातच आता पुण्यातील पालखी मार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेतर जिल्ह्यातील पालखी मार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. मात्र या मार्गावरील हडपसर ते दिवेघाट या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

या भागातील रस्ता कमी रुंदीचा असल्याने तसेच या भागातील रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात नेमका रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच सुचत नाही.

म्हणून या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यामुळे हडपसर ते दिवे घाट हा पालखी मार्ग लवकरच दुरुस्त केला गेला पाहिजे आणि या मार्गाची रुंदी वाढवली पाहिजे अशी मागणी केली जात होती.

त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, खासदार सुळे यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला आहे.

या मार्गांच्या कामासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आली. या कामासाठी 399 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र आता या रकमेत वाढ झाली आहे. या कामासाठी आता 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास आता गुळगुळीत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. हडपसर ते दिवे घाट दरम्यान होणारी वाहतूक कोंडी यामुळे बऱ्यापैकी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल अशी आशा आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा