Pune News : जर तुम्हीही राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचे अर्थातच पुण्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर पुणेकरांचा मेट्रो हा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. पुण्यातील मेट्रो जगात भारी ठरत आहे. खरंतर संपूर्ण पुणे जगात भारी आहे मात्र मेट्रो सुरु झाल्यापासून पुण्याला एक वेगळेच रुपड प्राप्त झाल आहे.
यामुळे जगात भारी पुण्याची मेट्रो वारी असं सर्वत्र बोललं जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी इथं नमूद करू इच्छितो की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. सध्या स्थितीला शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे.
वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गाच्या विस्ताराचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून शुक्रवारी अर्थातच 6 ऑक्टोबर 2023 रोजी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतच्या मार्गावर मेट्रोचे यशस्वी ट्रायल देखील घेण्यात आले आहे.
म्हणजेच या विस्तारित मेट्रो मार्गावर देखील आगामी काही दिवसात मेट्रो धावणार आहे. यामुळे साहजिकच पुणेकरांचा प्रवास आणखी गतिमान सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात पुणेकरांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे आणि विशेष म्हणजे ही बातमी पुण्यातील मेट्रो संदर्भातच आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आता पुणेकरांना मेट्रोच्या तिकीट दरात तीस टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. वास्तविक, पुणे मेट्रो मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याआधीच तिकीट दरात सवलत पुरवली गेली आहे. पण आता पुण्यातील इतर सामान्य नागरिकांना देखील मेट्रोच्या तिकीट दरात सवलत देण्याचा महत्त्वाचा असा निर्णय महामेट्रोच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याचे वृत्तसमोर आले आहेत.
याबाबत महा मेट्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हणजें X वरून माहिती दिली आहे. सदर माहितीनुसार आता पुणे मेट्रोने शनिवारी आणि रविवारी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजेच जर तुम्ही वीकेंडला पुणे मेट्रोने प्रवास केला तर तुम्हाला तिकीट दरात 30% पर्यंत सूट मिळेल. यामुळे वीकेंडला पुणे फिरणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. निश्चितच पुण्यातील रहिवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.