पुण्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन मेट्रो मार्ग ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की शहरात विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून एकात्मिक प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक एक भाग म्हणून खडकवासला धरणातून फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी घेऊन जाण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खरंतर उन्हाळी आवर्तनामुळे, बाष्पीभवनामुळे आणि पाण्याच्या गळतीमुळे धरणातील सुमारे 2.8 अब्ज घनफूट म्हणजेच टीएमसी पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत पाण्याचा हा होणारा अपव्यय टाळण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगदा विकसित केला जाणार असून या बोगद्यातून पाण्याचे वहन केले जाणार आहे. दरम्यान हा 28 किलोमीटर लांबीचा बोगदा राहणार आहे. या बोगद्याच्या अर्थातच बंद कालव्याच्या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पाला राज्य शासनाकडून लवकरच मंजुरी मिळणार अशी माहिती तज्ञ लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे जवळपास अडीच टीएमसी पाणी वाचणार असल्याने जलसंपदा विभागाकडून हा प्रकल्प तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अशातच आता या प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे खडकवासला ते फुरसुंगी यादरम्यान कालवा ऐवजी बोगदा प्रस्तावित करण्यात आला असल्याने आधीच्या ओपन कालव्याच्या जागेवर आता रस्ता, उड्डाणपूल किंवा मेट्रो मार्गीका यापैकी कोणताही एक प्रकल्प तयार केला जाणार आहे.

दरम्यान ही जागा रस्ता, उड्डाणपूल किंवा मेट्रो मार्गीका यापैकी कोणत्या कामासाठी उपयुक्त राहील याचा अभ्यास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राजधानी मुंबईत याबाबत बैठक घेतली होती.

बैठकीत पवार यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या समवेत याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रमकुमार यांनी याबाबतचा अहवाल अभ्यास करून सादर केला जाणार असल्याची माहिती दिली असून अहवालानंतर अंतिम निर्णय होणार अस सांगितलं जात आहे. या ठिकाणी जर रस्ता, उड्डाणपूल किंवा मग मेट्रो मार्गीका तयार झाली तर या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.