पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन उड्डाणपूल, पुढच्या आठवड्यात सुरू होणार काम ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरे तर शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये मोठे शर्तीचे प्रयत्न झाले आहेत. शहरात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

आता पुणे शहरात एक नवीन रेल्वे उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. विशेष म्हणजे याचे काम पुढच्या आठवड्यात सुरू होणार असे वृत्त समोर येत आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, कोरेगाव पार्क ते कॅम्प परिसराला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ट्रॅक तयार झालेले आहेत.

अशा परिस्थितीत या भागातून प्रवास करण्यासाठी एक उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. ‘रेल्वे ट्रॅक’वरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी हा पूल तयार झाला आहे.

याला साधू वासवानी असे नाव देण्यात आले आहे. मात्र, हा पूल आता धोकादायक बनला आहे. यामुळे गेल्या एका वर्षभरापासून या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरम्यान आता या ठिकाणी नवीन चार पदरी पूल तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास 83 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून आता या पुलाचे बांधकाम सुरु करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पण याचे काम सुरू करण्यापूर्वी मात्र पुलावरील वाहतूक वळवावी लागणार आहे.

यासाठी वाहतूक पोलिसांकडे मागणी करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात यावर निर्णय होणार आहे. यामुळे पुढील आठवड्यात या पुलाचे काम सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे.

मध्यंतरी मात्र या साधू वासवानी पुलाची लांबी वाढवण्याबाबत चर्चा रंगली होती. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तांत्रिक तपासणी देखील सुरू आहे.

पण यावर अद्याप निर्णय झालेला नाही, तरीही आता या पुलाचे काम सुरू होणार आहे. हा नवीन पूल 640 मीटर लांबीचा आणि 17.150 मीटर रुंदीचा राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा