पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कसा आहे रूट अन वेळापत्रक ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : नववर्ष सुरू होण्याआधीच पुण्यातील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याहून एक नवीन बस सेवा सुरू झाली आहे. पुण्यातील स्वारगेट येथून ही बस सेवा सुरु झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नाशिक दरम्यान ई-शिवाई बससेवेचा नुकताच श्री गणेशा झाला आहे. खरे तर 15 ऑगस्ट पासून पुणे येथील शिवाजीनगर ते नाशिक दरम्यान ई-शिवाई बस सुरू झाली आहे.

मात्र अनेकांच्या माध्यमातून स्वारगेट मधूनही नाशिक साठी बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता शिवाजीनगर येथून धावणारी ही बस स्वारगेट मधून चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथून दर एका तासाला नाशिकसाठी ई-शिवाई बस होती. आता स्वारगेट येथून देखील दर एका तासाला ही बस सुरु झाली आहे. पुणे एसटी विभागाने पहाटे पाच ते दुपारी एक दरम्यान शिवाजीनगर येथून दर एका तासाला सुटणारी ही बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरुवात केली आहे.

म्हणजेच आता स्वारगेट आगारातून दर एका तासाला नाशिक साठी बस उपलब्ध राहणार आहे. ही बस सेवा सकाळी पाच ते दुपारी एक दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

खरंतर सध्या नाशिककरांना जर पुण्याला जायचे असेल तर रस्ते वाहतुकी शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण की, पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग अजूनही तयार झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास करण्यासाठी एक तर खाजगी वाहनांचा किंवा मग एसटी महामंडळाच्या बसचाचं पर्याय उपलब्ध आहे.

पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पण या प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार हा मोठा सवाल आहे. यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना सध्या प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बस सर्वात बेस्ट पर्याय ठरत आहेत. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा